Axar Patel Catch Video: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसऱ्या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना २१९ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेने जवळजवळ मजल मारली होती.
मात्र शेवटी अर्शदीप सिंगने शानदार गोलंदाजी करत संघाला विजय मिळवून दिला. दरम्यान दक्षिण आफ्रिकेला संकटातून बाहेर काढून विजयाच्या दिशेने घेऊन जाणारा डेव्हिड मिलर पुन्हा एकदा शेवटच्या क्षणी माघारी परतला. त्याला बाद करण्यासाठी अक्षर पटेलने शानदार झेल घेतला, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेतील फायनलचा सामना भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये पार पडला होता. या सामन्यात भारत आणि वर्ल्डकप ट्रॉफीच्या मध्ये डेव्हिड मिलर उभा होता.
मात्र त्यावेळी शेवटच्या षटकात हार्दिक पंड्याच्या गोलंदाजीवर सूर्यकुमार यादवने बाऊंड्रीलाईनवर भन्नाट झेल घेतला होता. त्यामुळे डेव्हिड मिलर बाहेर झाला होता. यावेळीही दक्षिण आफ्रिकेचा विजय समोर दिसत होता.
हार्दिक पंड्या गोलंदाजी करत होता आणि डेव्हिड मिलर दक्षिण आफ्रिकेला विजय मिळवून देण्याच्या वाटेवर होता. मात्र यावेळी सूर्याने नव्हे, तर अक्षर पटेलने अविश्वसनिय झेल घेत त्याला माघारी धाडलं.
तर झाले असे की, दक्षिण आफ्रिकेची फलंदाजी सुरु असताना,१६ वे षटक टाकण्यासाठी गोलंदाजीला आला. या षटकातील पाचवा चेंडू हार्दिकने शॉर्ट टाकला. या चेंडूवर डेव्हिड मिलरने लेग साईडच्या दिशेने मोठा फटका खेळला.
मात्र चेंडू फार लांब जाऊ शकला नाही. मिडविकेटला क्षेत्ररक्षण करत असलेल्या अक्षर पटेलने उंच ऊडी घेत शानदार झेल घेतला. हा झेल घेतल्यानंतर डेव्हिड मिलरलाही विश्वास बसत नव्हता.
तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं, तर दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाला २० षटकअखेर ६ गडी बाद २१९ धावा करता आल्या. दक्षिण आफ्रिकेला हा सामना जिंकण्यासाठी २२० धावा करायच्या होत्या. मात्र दक्षिण आफ्रिकेला २०८ धावांपर्यंत मजल मारता आली. भारताने हा सामना ११ धावांनी जिंकत, मालिकेत २-१ ने आघाडी घेतली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.