jasprit bumrah saam tv news
Sports

Jasprit Bumrah Record: केपटाऊन कसोटीत बुमराह रचणार इतिहास! मोठ्या रेकॉर्डमध्ये अनिल कुंबळेला मागे सोडत बनू शकतो नंबर १

India vs South africa : केपटाऊनच्या मैदानावर भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा कसोटी सामना खेळला जाणार आहे.

Ankush Dhavre

India vs south africa 2nd test, Jasprit Bumrah Record:

केपटाऊनच्या मैदानावर भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा कसोटी सामना खेळला जाणार आहे. भारतीय संघ या मैदानावर आजवर एकही सामना जिंकू शकलेला नाही. आतापर्यंत दोन्ही संघ या मैदानावर ६ वेळेस आमने सामने आले आहेत.

यादरम्यान दक्षिण आफ्रिकेने ४ सामने जिंकले आहेत. तर २ कसोटी सामने ड्रॉ राहिले आहेत. दरम्यान ३ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघातील वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला एक मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर करण्याची संधी असणार आहे.

पहिल्या सामन्यात भारतीय संघाचा दारुण पराभव..

भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमधील पहिला सामना सेंच्युरियनच्या मैदानावर पार पडला होता. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने दमदार खेळ करत भारतीय संघाला मागे सोडलं. हा सामना भारतीय संघाला १ डाव आणि ३२ धावांनी गमवावा लागला. दुसरा कसोटी सामना येत्या ३ जानेवारीपासून खेळला जाणार आहे. दरम्यान हा सामना जिंकून भारतीय संघ मालिका १-१ च्या बरोबरीत आणण्याच्या प्रयत्नात असणार आहे. जर या सामन्यात रोहितने भारतीय संघाला विजय मिळवून दिला. तर तो असा कारनामा भारताचा दुसराच कर्णधार ठरेल. यापूर्वी केवळ एमएस धोनीला दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका ड्रॉ करण्यात यश आले आहे. मात्र हे सोपं मुळीच नसणार आहे. (Latest sports updates)

बुमराहकडे नंबर १ बनण्याची संधी..

पहिल्या कसोटी सामन्यात जसप्रीत बुमराहने अप्रतिम गोलंदाजी केली होती. तो या सामन्यात भारतीय संघाकडून सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला होता. त्याने गोलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेच्या ४ फलंदाजांना बाद केलं. केवळ ३ गडी बाद करताच तो या मैदानावर कसोटीत सर्वाधिक गडी बाद करणारा गोलंदाज ठरू शकतो.

बुमराहने या मैदानावर २ सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने १० गडी बाद केले आहेत. त्याने एका डावात ५ गडी बाद करण्याचा कारनामाही केला आहे. तर अनिल कुंबळे यांनी या मैदानावर खेळताना ३ सामन्यात ११ गडी बाद केले होते. तर जवागल श्रीनाथ यांनी १२ गडी बाद केले होते. बुमराहला नंबर १ बनण्यासाठी ३ फलंदाजांना बाद करायचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO शटडाऊन! ३ दिवस बंद राहणार PF पोर्टल, 'ही' कामं करताना येणार अडचणी; ५ पर्याय कोणते?

Maharashtra News Live Update: शिवसेना शिष्टमंडळाची महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन देत आंदोलनाचा इशारा

Chilli Potato Recipe: घरच्या घरी बनवा रेस्टॉरंट स्टाईल चिली पोटॅटो; वाचा खास रेसिपी

Maharashtra To Bihar Amrit Bharat Train: पुणे ते दानापुर दरम्यान धावणार ट्रेन; जाणून घ्या अमृत भारत ट्रेनचा मार्ग, कोचसंख्या टाईमटेबल अन् थांबा

RBI Digital Fraud Rules: डिजिटल फसवणूक प्रकरणी आरबीआयचा मोठा निर्णय; बँक देणार नुकसान भरपाई

SCROLL FOR NEXT