TILAK VARMA TWITTER
Sports

IND vs SA: नॉर्मल वाटलोय का? Tilak Varmaचा कोएत्जीला स्टेडियमबाहेर षटकार - VIDEO

Tilak Varma Six Video: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या टी -२० सामन्यात तिलक वर्माने गगनचुंबी षटकार खेचला. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

Ankush Dhavre

Tilak Varma Six News In Marathi: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या टी -२० सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला. सलग दुसऱ्यांदा भारतीय संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरला. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाला सुरुवातीला ३ मोठे धक्के बसले.

सुरुवातीला ३ धक्के बसल्यानंतर तिलक वर्माने अक्षर पटेलसोबत मिळून डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान तिलकने गेराल्ड कोएत्जीच्या षटकात गगनचुंबी षटकार मारला. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

तिलकचा स्टेडियमबाहेर षटकार

तर झाले असे की, भारतीय संघाची फलंदाजी सुरू असताना तिलक वर्मा स्ट्राईकवर होता. त्यावेळी गेराल्ड कोएत्जी पाचवे षटक टाकण्यासाठी गोलंदाजीला आला होता. या षटकातील पाचव्या चेंडूवर तिलक वर्माने लेग साईडच्या दिशेने गगनचुंबी षटकार मारला. हा चेंडू थेट मैदानाबाहेर जाऊन पडला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

भारताचा टॉप ऑर्डर कोसळला

या सामन्यात भारतीय संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आला होता. मात्र भारतीय संघाला हवी तशी सुरुवात करता आली नाही. पहिल्याच षटकातील दुसऱ्या चेंडूवर भारतीय संघाला मोठा धक्का बसला.

संजू सॅमसन शून्यावर माघारी परतला. त्यानंतर ४ धावांवर अभिषेक शर्मा बाद होऊन माघारी परतलेला. सूर्यकुमार यादवकडून मोठ्या अपेक्षा होती. मात्र तो अवघ्या ४ धावांवर माघारी परतला. तिलक वर्माला चांगली सुरुवात मिळाली होती. मात्र २० धावांवर तो तंबूत परतला.

या सामन्यासाठी अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११:

भारत: संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, रिंकू सिंग, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, रवि बिश्नोई, वरुण चक्रवर्ती, आवेश खान

दक्षिण आफ्रिका: रायन रिकेल्टन, रिझा हेंड्रिक्स, एडन मार्कराम (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, हेनरिक क्लासेन (यष्टीरक्षक), डेव्हिड मिलर, मार्को जॅन्सन, अँडिले सिमेलाने, जेराल्ड कोएटझी, केशव महाराज, नकबायोम्जी पीटर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT