sunil gavaskar google
Sports

IND vs SA: टीम इंडिया कुठे कमी पडली, खेळाडूंच्या बेजबाबदारपणावरुन सुनील गावस्कर भडकले, म्हणाले...

Sunil Gavaskar: या सामन्याचा निकाल अवघ्या ३ दिवसात लागला आहे. दरम्यान या पराभवानंतर भारतीय संघाचे माजी कर्णधार सुनील गावसकरांनी भारतीय संघाच्या तयारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

Ankush Dhavre

Sunil Gavaskar On Team India Defeat:

भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर हे भारतीय संघाच्या निराशाजनक कामगिरीनंतर नाराज असल्याचे दिसून आले आहे. सध्या भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे.

या मालिकेतील पहिल्याच सामन्यात भारतीय संघाला १ डाव आणि ३२ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला आहे. अवघ्या ३ दिवसात या सामन्याचा निकाल लागला आहे. या विजयासह दक्षिण आफ्रिकेने भारतीय संघावर १-० ची आघाडी घेतली आहे.

सुनील गावसकर भडकले...

या सामन्याचा निकाल अवघ्या ३ दिवसात लागला आहे. दरम्यान या पराभवानंतर भारतीय संघाचे माजी कर्णधार सुनील गावसकरांनी भारतीय संघाच्या तयारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या सुमार कामगिरीनंतर सुनील गावसकर भारतीय खेळाडूंवर जोरदार टीका केली आहे.

स्टार स्पोर्ट्सवर चर्चा करताना सुनील गावसकर म्हणाले की,'भारतीय संघ जेव्हा जेव्हा दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाते त्यावेळी सराव सामने खेळणं अतिशय गरजेचं आहे. भारतीय संघाला जर परदेशात जाऊन जिंकायचं असेल तर, युवा खेळाडूंचा जास्तीत जास्त सराव होणं गरजेचं आहे. तुम्ही वरिष्ठ खेळाडूंना १-२ दिवसांपूर्वी संघात येण्याची अनुमती देऊ शकता. मात्र मोठ्या मालिकेपूर्वी इंडिया- ए चे सामने खेळवले गेले पाहिजे. जे खेळाडू चांगली कामगिरी करतील त्यांना संघात स्थान दिलं गेलं पाहिजे. वर्कलोड मॅनेजमेंटसारख्या गोष्टींकडे दुर्लक्ष करायला हवं.' (Latest sports updates)

भारतीय संघाचा दारुण पराभव..

या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाकडून केएल राहुलने सर्वाधिक १०१ धावांची खेळी केली. या खेळीच्या बळावर भारतीय संघाने २४५ धावांपर्यंत मजल मारली.

मात्र या धावांच्या प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेने ४०८ धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेकडून डीन एल्गरने सर्वाधिक १८५ धावांची खेळी केली. या धावांच्या प्रत्युत्तरात भारतीय संघाला दुसऱ्या डावात १३१ धावा करता आल्या. हा सामना भारतीय संघाला १ डाव आणि ३२ धावांनी गमवावा लागला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rashmika Mandanna : रश्मिका मंदानाचा ‘Thama’मधील ग्लॅमरस लूक पाहून चाहते थक्क; पोस्टर प्रदर्शित

ठाण्यात पावसाचा धुमाकूळ, शाळा सोडल्या; विद्यार्थ्यांना बोटीतून नेलं, पाहा VIDEO

Aadesh Bandekar Son: आदेश बांदेकरांचा लेक लवकरच अडकणार विवाह बंधानात; 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत थाटणार संसार

सासरच्या छळाला कंटाळली! महिला पोलीस कॉन्स्टेबलनं आयुष्य संपवलं; VIDEOतून केला खुलासा

Maharashtra Rain Live News: तब्बल आठ तासानंतर अंधेरी सबवे वाहतुकीसाठी खुला

SCROLL FOR NEXT