IND Vs PAK Women's World Cup 2025 x
Sports

IND Vs PAK : टीम इंडियाची मोठी फसवणूक, मॅच रेफरीने पाकिस्तानला जिंकवलं; नेमकं काय घडलं? VIDEO

IND Vs PAK Womens World Cup 2025 : महिला वनडे वर्ल्डकप २०२५ मधील भारत विरुद्ध पाकिस्तान सामना कोलंबोमध्ये सुरु आहे. या सामन्यात मॅच रेफरीने पाकिस्तानची बाजू घेतल्याचे म्हटले जात आहे.

Yash Shirke

  • भारत विरुद्ध पाकिस्तान सामना सुरु आहे.

  • भारतीय संघाची फसवणूक झाली.

  • मॅच रेफरीने पाकिस्तानला जिंकवून दिले.

India Vs Pakistan Womens World Cup 2025 : श्रीलंकेतील कोलंबो येथे भारत विरुद्ध पाकिस्तान हा महिला वर्ल्डकप २०२५ मधील सामना सुरु झाला आहे. या सामन्यात पाकिस्तानची कर्णधार फातिमा सना खानने टॉस जिंकला आणि भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. टॉसदरम्यान मॅच रेफरीने घोटाळा केल्याचे म्हटले जात आहे. मॅच रेफरीने पाकिस्तानच्या बाजूने टॉसचा कॉल दिला.

भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने टॉससाठी नाणे हवेत फेकले. पाकिस्तानची कर्णधार फातिमान सना खानने मोठ्याने टेल्स असे म्हटले. यानंतर मॅच रेफरी शांद्रे फ्रिट्झ आणि टॉस प्रेझेंटर मेल जोन्स... हेड्स इज द कॉल आणि हेड्स आले असे म्हणाल्या. पाकिस्तानने टेल्स म्हटले असताना हेड्स आल्यावर पाकिस्तानने टॉस कसा जिंकला असा सवाल चाहत्यांनी केला आहे.

खरं पाहता, पाकिस्तानने टेल्स म्हटल्याने हेड्स आल्यावर भारताने टॉस जिंकायला हवा होता. पण त्याआधीच मॅच रेफरी यांनी पाकिस्तानने टॉस जिंकल्याचे जाहीर केले. यावर पाकिस्तानने टॉस जिंकल्याचे मान्य केले. लगेच रेफरी यांनी पाकिस्तानी कर्णधाराला तुम्ही काय निवडणार हे विचारले. सना यांनी विलंब न करता पाकिस्तानचा संघ प्रथम गोलंदाजी करणार असल्याचे सांगितले. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

क्रिकेटमध्ये अशा चुका सहसा होत नाही. टॉस दरम्यान चूक झाल्याचे भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरच्या लक्षात आले नाही. आवाजामुळे किंवा अन्य काही कारणांमुळे तिने फातिमा सनाचा आवाज ऐकला नसावा असे म्हटले जात आहे. पण टॉस कोणी जिंकला हे जाहीर करण्याची जबाबदारी मॅच रेफरी आणि मॅच प्रेझेंटरची असते. त्यामुळे या प्रकरणी मॅच रेफरी आणि मॅच प्रेझेंटर यांच्यावर टीका होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'डॉक्टरांचा विश्रांती घेण्याचा सल्ला, त्यामुळे...; राज्यसभेसाठी अर्ज भरल्यानंतर शरद पवारांची सोशल मीडियावर खास पोस्ट

युद्धात ग्रॅव्हिटी बॉम्ब विध्वंस घडवणार? अमेरिकेचे सर्वात घातक अण्वस्त्र

Maharashtra Live News Update : क्लास चालू असतानाच कोसळला स्लॅब, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, कोपरखैरणेमधील घटना

राज्यसभेवरून मविआत नाराजीनाट्य? पवारांना उमेदवारी ठाकरे नाराज?

IND vs ENG Semi Final: वानखेडेवर संजू सॅमसनकडून इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई, टीम इंडियानं उभारला धावांचा डोंगर

SCROLL FOR NEXT