Ind vs Pak Saam Tv
Sports

पाकिस्तान विरुद्ध सामन्यापूर्वी टीम इंडिया समोर हे ५ मोठे प्रश्न

टीम इंडियाची आता टी-20 वर्ल्ड कपकडे वाटचाल सुरू आहे, त्यामुळे टीमधील दुरुस्ती करण्यावर भर द्यावा लागणार आहे.

साम वृत्तसंथा

नवी दिल्ली: टी 20 वर्ल्ड कप सुरू होऊन भारताचे (Team India) दोन सामनेही झाले आहेत, पहिला सामना पाकिस्तान विरुद्ध तर दुसरा सामना हाँगकाँग विरुद्ध झाला. दोन्ही सामन्यात टीम इंडियाने जोरदार कामगिरी केली. आता टीम इंडियाची वाटचाल T 20 चषकाच्या जवळ पोहोचली आहे. सुपर ४ राऊंडमध्ये टीमने आपले स्थान आता पक्के केले आहे. आता आज पुन्हा पाकिस्तान विरुद्ध सामना होणार आहे.

टीम इंडियाने (Team India) दोन्ही सामने जिंकले असले तरी माजी क्रिकेट पट्टुंनी संघाच्या कामगिरीवर उघडपणे प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. आज पाकिस्तान विरुद्ध सामना होणार आहे, या सामन्यापूर्वी संघाला ५ मुद्द्यावर काम करावे लागणार आहे. हे पाच प्रश्न कर्णधार रोहित शर्मासाठी आहेत.

केएल राहुल

केएल राहुल संदर्भात हर्ष भोगलेपासून आकाश चोप्रापर्यंत सर्वांनी चिंता व्यक्त केली आहे. दुखापतीतून सावरल्यानंतर झिम्बाब्वेविरुद्ध पुनरागमन करणार्‍या केएल राहुलने अजुनही खेळी दाखवलेली नाही. केएलने खेळलेल्या दोन सामन्यांमध्ये वैयक्तिक एकूण ३६ धावांसह समान धावा केल्या आहेत. त्याची सरासरी १८ आणि स्ट्राईकरेट ९०.०० आहे.

कर्णधार रोहित शर्मा

कर्णधार रोहित शर्मावरही टीका होत आहेत. पहिल्या दोन सामन्यांमध्ये कर्णधार रोहितकडून अपेक्षित कामगिरी पाहायला मिळाली नाही. हाँगकाँगविरुद्ध मोठी खेळी खेळण्याची संधीही त्याने गमावली. आणि आतापर्यंत त्याला दोन्ही सामन्यात केवळ २३ धावा करता आल्या आहेत. रोहितचे पाकिस्तानविरुद्ध टी-20 मध्ये रेकॉर्ड खूपच खराब आहे. ९ सामन्यांमध्ये रोहितने १४ पेक्षा कमी सरासरीने केवळ ८२ धावा केल्या आहेत.

विराट कोहली

विराट कोहलीने हाँगकाँगविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात अर्धशतक झळकावून टीकाकारांना उत्तर दिले आहे. दानिश कनेरिया आणि वसीम जाफर कोहली बाबत खूश दिसले नाहीत. कोहलीने अजुनही चांगली खेळी केलेली नाही. पाकिस्तानविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात त्याचा डाव फसला.

युजवेंद्र चहल

युएईच्या मैदान फिरकीपटूंना अनुकूल आहेत. अफगाणिस्तानचा रशीद आणि मुजीब-उर-रहमान विकेट घेत आहेत, तर चहलने दोन्ही सामन्यात टाकलेल्या आठ षटकांत ५० धावा देऊनही एकही बळी घेतलेला नाही. त्यामुळे त्याच्या कामगिरीवरही टीका होत आहे.

अर्शदीप सिंग

आशिया चषक स्पर्धेसाठी अर्शदीप सिंगची भारतीय संघात (Team India) निवड स्लॉग ओव्हर्समध्ये धावांवर मर्यादा घालण्यासाठी केली आहे. पण त्याच्याकडून तशी कामगिरी होत नसल्याचे दिसत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे हाँगकाँगसारख्या संघाविरुद्ध त्याने ४ षटकात ४४ धावा दिल्या. अर्शदीपने आतापर्यंत ७.५ षटके टाकली आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Palghar Constable Death Case: पत्नीनं पोलीस नवऱ्याचा घेतला जीव? पोलीस कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनं पालघरमध्ये खळबळ

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! कृषी योजनांचा लाभ मिळवायचाय? ई-केवायसी अन् फार्मर आयडी आहे गरजेचं

Weather Update: सोसाट्याच्या वाऱ्यासह कोसळणार धुव्वाधार पाऊस; १६ राज्यांसाठी पावसाचा अलर्ट

तुमच्या सौंदर्यावर पाकचा क्रिम 'बॉम्ब', आरोग्याला घातक उत्पादनांची महाराष्ट्रात घुसखोरी

दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणामागे मोदींचा डाव? डिलिमिटेशनसाठी नेमकं काय घडतंय?

SCROLL FOR NEXT