Ind vs Pak T20 Asia Cup 2022  Saam Tv
क्रीडा

Ind vs Pak T20 Asia Cup : राहुल द्रविडची 'ती' चाल यशस्वी; पाकचा सुपडा साफ, भारताचा विजय

पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात भारताने ५ गडी राखत दणदणीत विजय मिळवला.

Satish Daud

Ind vs Pak T20 Asia Cup 2022 : आशिया कप २०२२ स्पर्धेत भारतीय संघाने (Team India) विजयी सुरूवात केली. पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात भारताने ५ गडी राखत दणदणीत विजय मिळवला. या विजयासह भारताने गेल्या वर्षी झालेल्या विश्वचषकाचादेखील वचपा काढला. भारताला शेवटच्या तीन चेंडूत ६ धावांची आवश्यकता असताना हार्दिक पंड्याने षटकार ठोकत भारतीय संघाला विजय मिळवून दिला. (IND vs Pak Latest News)

दरम्यान, या सामन्यांत टीम इंडियाचा हेड कोच राहुल द्रविड (Rahul Dravid) याने खेळलेली चाल यशस्वी ठरली. पाकिस्तानने दिलेल्या १४८ धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरूवात खराब झाली. कारण डावाच्या दुसऱ्याच चेंडूवर भारताचा सलमावीर केएल राहुल बाद झाला आणि भारताला पहिला धक्का बसला.

त्यानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली ही अनुभवी जोडी खेळपट्टीवर होती. पण रोहितला या सामन्यात लय सापडल्याचे पाहायला मिळाले नाही. कारण रोहित धावा जमवण्यासाठी झगडत होता. पण त्याचवेळी विराट आक्रमक खेळ करत होता.

थोड्यावेळात स्थिरस्थावर झाल्यावर रोहितने मोठे फटके खेळायला सुरुवात केली. पण रोहितची ही फटकेबाजी अल्पायुषी ठरली. रोहितला यावेळी १८ चेंडूंत १२ धावा केल्या. रोहित बाद झाल्यावर कोहलीवरसंघाची जबाबदारी होती. पण काही चेंडूंमध्येच कोहलीनेही आपली विकेट आंदण दिली आणि त्यामुळे भारत अडचणीत सापडला. कोहलीने यावेळी ३४ चेंडूंत ३५ धावा केल्या. (Ind vs Pak T20 Asia Cup 2022 Updates)

दरम्यान, रोहित शर्मा बाद होताच टीम इंडियाने नवी चाल खेळली. सुर्यकुमार यादवच्या आधी टीम इंडियाने डावखुरा फलंदाज रविंद्र जडेजाला फलंदाजीसाठी पाठवलं. पाकिस्तानचा संघाला विकेट्स पडल्यानंतर सुर्यकुमार यादव हा फलंदाजीसाठी येईल, अशी अपेक्षा होती. मात्र, टीम इंडियाने जडेजाला फलंदाजीसाठी पाठवून पाकिस्तानला बुचकाळ्यात टाकलं. दरम्यान, फलंदाजीसाठी उतरलेल्या रविंद्र जडेजाने पहिल्या २९ चेंडूत ३४ धावा केल्या.

अखेरीस भारतीय संघाने हा सामना ५ विकेट्स आणि २ चेंडू राखून जिंकला. हार्दिक पांड्याने षटकार ठोकत भारतीय संघाला विजय मिळवून दिला. शेवटच्या षटकात ७ धावांची गरज असताना पहिल्या चेंडूवर जडेजा आऊट झाला.

त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या दिनेश कार्तिकने दुसऱ्या चेंडूवर एक धाव घेतली. अखेरच्या ४ चेंडूत भारतीय संघाला ६ धावांची गरज असताना, हार्दिकने तिसरा चेंडू सांभाळून खेळला. त्यानंतर चौथ्या चेंडूवर षटकार लगावत त्याने भारतीय संघाला विजय मिळवून दिला. भारताकडून जडेजाने ३५ धावांची दमदार खेळी साकारली, तर हार्दिकने नाबाद ३३ धावांची खेळी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: रोहित पवारांना धक्का; कर्जत जामखेडमध्ये राम शिंदे आघाडीवर

Yeola Constituency : येवल्यातून छगन भुजबळ यांना केवळ 86 मतांची आघाडी | Marathi News

Assembly Election Result: सर्वात मोठी बातमी! कॉग्रेसचे ३ दिग्गज नेते पिछाडीवर, महायुतीचा डाव पडला भारी

Maharashtra Election Result: एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांचं काय झालं? पाहा एका क्लिकवर

Maharashtra Assembly Election Result: सुरुवातीच्या कलात काँग्रेसचे 'हे' तीन दिग्गज नेते पिछाडीवर

SCROLL FOR NEXT