Pakistani cricketer Sahibzada Farhan sparks controversy with AK-47 gesture during India clash.” saam tv
Sports

Sahibzada Farhan: युद्धखोरीचा माज! साहिबजादा फरहान हॅरिस रौफची अ‍ॅक्शन, भारतानं ठेचल्या त्यांच्या नांग्या

Sahibzada Farhan: दहशतवाद पोसणाऱ्या पाकिस्तानी क्रिकेटरने थेट मैदानावर युद्धखोरीचा माज दाखवलाय. मात्र पाकिस्तानी क्रिकेटर साहिबजादा फरहाननं नेमकी कोणती अॅक्शन केली आणि भारतानं त्यांच्या कशा नांग्या ठेचल्या? त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट.

Suprim Maskar

साहिबजादा फरहान याने भारताविरुद्ध AK-47 अॅक्शन करून वाद निर्माण केला.

भारताने मैदानावर कामगिरीतून पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिलं.

या अॅक्शनमुळे भारतीय प्रेक्षक आणि चाहत्यांच्या भावना दुखावल्या.

खेळाच्या मैदानाला युद्धाचं मैदान समजून भारतीयांना डिवचणारा हा आहे पाकिस्तानचा क्रिकेटपटू साहिबजादा फरहान. भारत-पाकिस्तान सामन्यात अर्धशतक पूर्ण केल्यावर AK 47 मधून गोळ्या झाडत असल्याची अॅक्शन करत भारतीयांच्या भळभळत्या जखमेवर मीठ चोळण्याचा घृणास्पद प्रकार या खेळाडूनं केलाय. मात्र क्रिकेटच्या मैदानावर युद्धखोरीचा हा माज नेमका येतो कुठून?

पण पाकड्या खेळाडूंचा हा माज इथेच संपला नाही. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हॅरिस सीमारेषेवर फिल्डिंग करत असताना भारतीय प्रेक्षकांनी विराट कोहलीच्या नावाने जयजयकार केला. यावर रौफने भारतीय प्रेक्षकांना डिवचत राफेल कोसळल्याची अॅक्शन केली. ऑपरेशन सिंदुरमध्ये भारतीय राफेल पाडल्याचा खोटा दावा पाकिस्तानकडून वारंवार केला जातोय. रौफने मैदानात तेच केलं.

पाकिस्तानी खेळाडूंच्या या वृत्तीला भारतीय खेळाडूंनी पहिल्या बॉलपासून उत्तर दिलं. अभिषेक शर्माने शाहिन आफ्रिदीच्या पहिल्याच चेंडूवर सिक्सर मारला. तर त्यानंतर आलेल्या हॅरिस रौफलाही अभिषेकने पहिल्याच बॉलवर बाऊंड्री दाखवली. त्यामुळे चिडलेला रौफ अभिषेकच्या अंगावर धावून गेला. यावर अभिषेक शर्मा आणि शुभमन गिला दोघंही रौफला भिडले. या सामन्यात भारताने पाकिस्तानचा 6 विकेटने पराभव केला.

दुसरीकडे साहिबजादाच्या या वादग्रस्त व्हिडिओनंतर सोशल मीडियातही भारतीयांनी त्याच्याविरोधात चांगलाच संताप व्यक्त केला. आता हा व्हिडओ बघा.पाकिस्तानमधील दहशतवादी सैनिकांच्या संस्थेकडून साहिबजादाला ट्रेनिंग मिळत असल्यानं तो 'पार्ट टाइम क्रिकेटर, फूल टाइम दहशतवादी आहे’ अशी टीका सोशल मीडियात करण्यात आली.

भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेल्या 7 पैकी सातही सामन्यात टीम इंडियानं पाकला धुळ चारली आहे. त्यामुळे मैदान खेळाचं असो की युद्धाचं जिंकणार तर भारतच हे नक्कीय. मात्र साहिबजादानं केलेल्या एका अॅक्शनमुळे हा खेळ न राहता निष्पाप पर्यटकांच्या मृत्यूचा बाजार मांडला गेला त्याचं काय?क्रिकेटच्या बाजारात राष्ट्रनिष्ठा नेमकी कुठे हरवली? युध्दखोरीचा माज ठासून भरलेल्या पाकिस्तानसोबत सामना खेळण्याची खरचं गरज होती का?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pimpri Chinchwad : सराफा दुकानात दरोड्याचा प्रयत्न; रावण टोळीतील आणखी तिघे ताब्यात

Beed Flood News : एनडीआरएफ पथकाची कौतुकास्पद कामगिरी, भर पावसात नवजात बाळ आणि महिलेची केली सुखरूप सुटका

Maharashtra Live News Update: सोलापूर जिल्ह्यात झालेल्या ढगफुटीसदृश्य पावसामुळे अनेक वस्ती पाण्याखाली

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी, २२१५ कोटींची मदत जाहीर, फडणवीस सरकारचा निर्णय

Jalgaon Rain : भडगाव येथील रुग्णालयात पुराचं पाणी, नर्स आणि रुग्णांचे रेस्क्यू | VIDEO

SCROLL FOR NEXT