team india yandex
क्रीडा

Rohit Sharma: 'शमीला ऑस्ट्रेलियाला घेऊन जाणार नाही..' रोहित शर्माच्या वक्तव्याने खळबळ; नेमकं काय म्हणाला?

Ankush Dhavre

Rohit Sharma On Mohammed Shami: भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये ३ कसोटी सामन्यांची मालिका रंगणार आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना उद्या म्हणजे १६ ऑक्टोबरपासून बंगळुरुतील एम चिन्नास्वामीच्या मैदानावर रंगणार आहे. मायदेशात खेळताना भारतीय संघाचा दबदबा पाहायला मिळाला आहे.

बांगलादेशचा सुपडा साफ केल्यानंतर आता भारतीय संघ न्यूझीलंडला धूळ चारण्याच्या प्रयत्नात असणार आहे. दरम्यान या सामन्याच्या एक दिवसाआधी झालेल्या पत्रकार परिषदेत रोहित शर्माने मोहम्मद शमीच्या फिटनेसबाबत मोठा खुलासा केला आहे.

मोहम्मद शमी हा भारतीय संघातील प्रमुख वेगवान गोलंदाजांपैकी एक आहे. आयसीसी वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत भारतीय संघाने फायनलमध्ये प्रवेश केला. भारतीय संघाला फायनलमध्ये पोहचवण्यात शमीने मोलाची भूमिका बजावली होती. या स्पर्धेत तो सर्वाधिक गडी बाद करणारा गोलंदाज ठरला होता.

मात्र ही स्पर्धा झाल्यानंतर त्याला दुखापतीमुळे संघाबाहेर व्हावं लागलं होतं. यावर्षी जानेवारी महिन्यात त्याच्या दुखापतीवर शस्त्रक्रिया करण्यात आली. आता तो सरावासाठी मैदानात उतरलाय, मात्र पूर्णपणे फिट झालेला नाही.

रोहित शर्मा काय म्हणाला?

गेल्या काही महिन्यांपासून शमीच्या कमबॅकची चर्चा सुरु आहे. मात्र अजूनपर्यंत त्याला कमबॅक करण्याची संधी देण्यात आलेली नाही. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीआधी झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना रोहित शर्मा म्हणाला की, 'ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी शमीबाबत निर्णय घेणं जर कठीण आहे. त्याच्या गुडघ्याला सुजन आहे. त्यामुळे तो जरा बॅकफूटवर आहे आणि त्याला पुन्हा नव्याने सुरु करावं लागणार आहे. आम्हाला अशा शमीला ऑस्ट्रेलियाला नाही घेऊन जायचं , जो पूर्णपणे फिट नसेल. पाहूया पुढे काय होतंय. '

भारतीय संघ ऑस्ट्रेलियात हॅट्रीक करणार

बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये भारतीय संघाचा दबदबा पाहायला मिळाला आहे. गेल्या २ मालिकांमध्ये भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला घरात घुसून पराभूत केलंय. गेल्यावेळी युवा खेळाडूंनी ऑस्ट्रेलियाचा धुव्वा उडवला होता. यावेळी ऑस्ट्रेलियाला पराभूत करुन भारतीय संघ विजयाची हॅट्रीक करण्याच्या प्रयत्नात असणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chandgad Vidhan Sabha : थंड हवेसाठी प्रसिद्ध असलेले चंदगड निवडणुकीत तापणार; सहा पक्षांचा कस लागणार, कोण ठरणार वरचढ?

Nikki Tamboli: अरबाज अन् मी... रिलेशनशिपच्या नात्यावर निक्की काय म्हणाली? वाचा

Eknath Shinde : 'मी स्वतः मराठा समाजाला आरक्षण देणार'; एकनाथ शिंदेंची जरांगेंच्या भूमिकेवर मोठं विधान

Walking Exercise : चालला तो जगला; थांबला तो संपला, वाचा महत्वाचे फायदे!

Neechbhang Rajyog: नीचभंग राजयोगामुळे चमकणार 'या' राशींचं नशीब; नवीन नोकरीसह बँक बॅलेन्सही वाढण्याचे योग

SCROLL FOR NEXT