hardik pandya twitter
Sports

IND vs NZ 1st Inning: हार्दिकची हार्ड हिटिंग! अय्यरचं तुफानी अर्धशतक; भारताने किवींसमोर ठेवलं मोठं आव्हान

India vs NZ Highlights: भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये साखळी फेरीतील शेवटचा सामना सुरु आहे. या सामन्यात भारतीय संघाने मोठी धावसंख्या उभारली आहे.

Ankush Dhavre

दुबईतील दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये साखळी फेरीतील शेवटचा सामना सुरु आहे. या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं होतं.

हा निर्णय न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी सार्थ ठरवला. न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी सुरुवातीलाच भारतीय संघाला ३ मोठे धक्के दिले. मात्र त्यानंतर अक्षर पटेल आणि श्रेयस अय्यरने मिळून भारतीय संघाचा डाव सांभाळला. दरम्यान प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने ५० षटकअखेर २४९ धावा केल्या असून न्यूझीलंडला हा सामना जिंकण्यासाठी २५० धावा करायच्या आहेत.

या सामन्यातही भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक गमावला. न्यूझीलंडने भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं. भारतीय संघाकडून फलंदाजी करण्यासाठी रोहित शर्मा आणि शुभमन गिलची जोडी मैदानात आली.

मात्र या जोडीला हवी तशी सुरुवात करुन देता आली नाही. संघाचा उपकर्णधार शुभमन गिल अवघ्या २ धावावंर तंबूत परतला. त्यानंतर रोहित शर्मानेही १५ धावांवर पॅव्हेलियनची वाट धरली. भारताची सलामी जोडी स्वस्तात माघारी परतल्यानंतर विराट कोहलीकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. मात्र तो देखील अवघ्या ११ धावांवर माघारी परतला.

अय्यर- अक्षरने सावरला डाव

भारतीय संघाला सुरुवातीला ३ धक्के बसल्यानंतर, भारतीय फलंदाजांवर दडपण आलं होतं. मात्र श्रेयस अय्यर आणि अक्षर पटेलने मिळून भारतीय संघाचा डाव सांभाळला. दोघांनीही किवी गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. दोघांनी मिळून अर्धशतकी भागीदारी केली. अय्यरला या डावात शतक पूर्ण करण्याची संधी होती.

मात्र तो ७९ धावांवर माघारी परतला. तर अक्षर पटेल अर्धशतकाच्या जवळ असताना ४२ धावांवर माघारी परतला. केएल राहुलला या डावात २३ धावा करता आल्या. शेवटी हार्दिक पंड्याने ४५ धावांची खेळी करत भारतीय संघाचा डाव २४९ धावांपर्यंत पोहोचवला.

या सामन्यासाठी अशी आहे भारतीय संघाची प्लेइंग ११:

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, अक्षर पटेल, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, वरूण चक्रवर्ती, कुलदीप यादव.

न्यूझीलंडची प्लेईंग ११

विल यंग, ​​रचिन रवींद्र, केन विल्यमसन, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम, ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, मिचेल सँटनर (कर्णधार), मॅट हेन्री, काइल जेमिसन, विल्यम ओरोरके.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai T20 League: टी-२० लीगमध्ये मराठा संघाची 'रॉयल' कामगिरी; सलग दुसऱ्यांदा जेपेतपदावर कब्जा

अनुसूचित जातीत उपवर्गीकरण करायला हरकत नाही; रामदास आठवलेंनी सांगितलं कारण, VIDEO

IND vs AFG: शुबमन गिलसमोर अफगाण गोलंदाजी फेल; टीम इंडियाचा पहिल्या वनडेत शानदार विजय

Yavatmal Crime: खासगी रुग्णालयात धारदार शस्त्राने हल्ला करत नर्सची हत्या; यवतमाळ हादरलं

वीज मीटर ४८ तासांत बदलणार; 'महावितरण'कडून ग्राहकांना अल्टिमेटम? काय आहे मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT