IND vs NZ: Team India Gave 398 Runs Target to New Zealand For ODI World Cup Semi Final  Saam tv
Sports

IND vs NZ 2023: एकच नंबर! अय्यर-विराटने वानखेडे मैदान गाजवलं, न्यूझीलंडसमोर उभारला 397 धावांचा डोंगर

IND vs NZ Semi Final 2023: टीम इंडियाच्या फलंदाजांनी प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली आहे.

Vishal Gangurde

India vs New Zealand 1st Inning Score Update:

मुंबईच्या वानखेडे मैदानावर विश्वचषक स्पर्धेत उपांत्य फेरीत भारत आणि न्यूझीलंडमध्ये हाय वोल्टेज सामना सुरू आहे. नाणेफेकीचा कौल जिंकून टीम इंडियाच्या फलंदाजांनी प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली आहे. विराट कोहली आणि श्रेयस अय्यरच्या शतकी खेळीच्या जोरावर टीम इंडियाने न्यूझीलंडला 398 धावांचं आव्हान दिलं आहे. (Latest Marathi News)

प्रथम फलंदाजी करताना विराट कोहली आणि श्रेयस अय्यरने शतकी खेळी खेळत ५० षटकात चार गडी गमावून ३९७ धावा चोपल्या. भारतासाठी विराटने ११७ धावांची खेळी खेळली.

विराटने शतकी खेळी करत सचिन तेंडुलकरचा वनडे फॉरमॅटमधील शतकांचा विक्रम मोडला. विराट कोहलीने वनडे फॉरमॅटमध्ये ५० शतक ठोकत नवा विक्रम केला आहे. सचिनच्या नावावर ४९ शतक आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या सामन्याच्या डावात श्रेयस अय्यरने १०५ धावांची दमदार खेळी खेळली. तर रोहित शर्मानेही ४७ धावा काढल्या. रोहित शर्मा आणि गिलने पहिल्या विकेटसाठी ७१ धावांची भागीदारी रचली. रोहित शर्माने २९ चेंडूत ४७ धावा काढल्या. शुभमन गिल ७९ धावांवर रिटायर्ड हर्ट झाला. या सामन्यात विराटने क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरचा शतकांचा विक्रम मोडला.

विराटने या सामन्यात ५० वे शतक ठोकले. विराट कोहलीने न्यूझीलंडच्या विरोधात विराटने ११३ चेंडूत ११७ धावा केल्या. तर श्रेयस अय्यरने १०५ धावा काढल्या. तर केएल राहुलने २० चेंडूत ३९ धावा काढल्या. टीम इंडियाने ५० षटकात ४ गडी गमावून ३९७ धावा केल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CHYD : कॉमेडीचा डॉन परत येतोय! 'चला हवा येऊ द्या २'मध्ये मराठमोळ्या अभिनेत्याची धमाकेदार एन्ट्री, पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: डोंबिवली रेल्वे स्टेशनवर एकादशी वारीचा पारंपरिक गजर

दारु पिऊन शिक्षकाचा शाळेतच विद्यार्थ्यांसोबत डान्स; व्हिडिओ पाहून राग अनावर होईल

Shirdi Sai Temple: विठू माऊली तू, माऊली जगाची...; आषाढीचा उत्साह शिर्डीत, फुलांनी सजले साई मंदिर

Thackeray Brothers : ठाकरेंच्या लढ्याला दक्षिणेचा पाठिंबा, थेट मुख्यमंत्र्यांनी केलं कौतुक, म्हणाले प्रेरणादायी...

SCROLL FOR NEXT