IND vs NZ T20 World Cup Final saam tv
Sports

T20 World Cup Final चा इफेक्ट! अहमदाबादमध्ये हॉटेल दर 300-400 टक्क्यांनी वाढले, एका रात्रीसाठी 2.37 लाख रुपये

IND vs NZ T20 World Cup Final: भारत विरुद्ध न्यूझीलंड टी20 वर्ल्डकप फायनलमुळे अहमदाबादमध्ये हॉटेल रूमच्या किमतींमध्ये 300 ते 400 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

Surabhi Jayashree Jagdish

आज अहमदाबादच्या मैदानावर महामुकाबला खेळवला जाणार आहे. भारत विरूद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये टी-२० वर्ल्डकपचा अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे. दरम्यान या सामन्यापूर्वी अहमदाबादमधील हॉटेल रूमच्या किमची गगनाला भिडल्या आहे. या किमतींमध्ये ५०-६० टक्के नाही तर ३०० ते ४०० टक्क्यांनी वाढ झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणाऱ्या या मोठ्या सामन्यामुळे हॉटेल रूमच्या मागणीत मोठी वाढ झालीये. हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ गुजरातचे अध्यक्ष नरेंद्र सोमाणी यांनी सांगितलं की, या निर्णायक सामन्यासाठी भारत आणि परदेशातून येणाऱ्या क्रिकेट चाहत्यांमुळे खोलीचे दर प्रचंड वाढलेत. अहमदाबादमधील हॉटेल रूमची किंमत 5000 ते 20,000 रुपये होती. तर त्यांच्या दरात आता 300 ते 400 टक्क्यांनी वाढ झालीये.त्यांची किंमत आता 15,000 ते 50,000 रुपयांपर्यंत पोहोचलीये.

ताज स्कायलाइनच्याही भाड्यात वाढ

सोमाणी यांनी सांगितलं की, ऑनलाइन बुकिंग प्लॅटफॉर्मवरही मोठ्या हॉटेल्सच्या दरांमध्ये मोठी वाढ होतेय. सिंधू भवन रोडवरील ताज स्कायलाइनमध्ये रविवारी रात्रीच्या 'डिलक्स रूम'चं भाडं २.०१ लाख रुपयांपर्यंत पोहोचलंय. त्यावर ३६,००० रुपये जीएसटी वेगळा भरावा लागणार आहे. त्यामुळे एकूण खर्च २.३७ लाख रुपये येणार आहे.

सामान्यतः या हॉटेल रूमचं भाडं ९००० ते १५,००० रुपयांपर्यंत आहे. जे आता जवळजवळ २० पटीने वाढलंय. त्याचप्रमाणे आश्रम रोडवरील वेलकॉम हॉटेल आणि हयात रेजन्सी सारख्या हॉटेल्सच्या दरांमध्येही सामान्य दराच्या तुलनेत तीन ते चार पट वाढ झालीये.

एका रात्रीसाठी हॉटेल रूम सुमारे २०,००० ते ३०,००० रुपयांना बुक केल्या जातायत. सोमाणी यांच्या मते, अहमदाबादमध्ये फर्स्ट क्लास सुमारे १०,००० हॉटेल रूम्स आहेत. सामन्यामुळे रविवारी शहर आणि आसपासच्या हॉटेल्समधील सुमारे ८० टक्के खोल्या भरल्या जाण्याची अपेक्षा आहे.

दरम्यान हॉटेलच्या किमती जास्त असल्याने बरेच फॅन्स रात्री राहण्याऐवजी इतर पर्याय निवडतायत. काही २५ किलोमीटर अंतरावर असलेल्या गांधीनगरमध्ये राहतायत. तर मोठ्या संख्येने क्रिकेट चाहते त्याच दिवशी सामना पाहिल्यानंतर परतण्याची योजना आखतायत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: NEETचा पेपर पुन्हा फुटला? टेलिग्रामवरून NEETची प्रश्नपत्रिका व्हायरल?

बेस्टचा संप, रिक्षाचालकांकडून लूट, सामच्या स्टिंगमध्ये लुटीचा पर्दाफाश

उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का बसणार? ठाकरेसेनेचे 14 आमदार फूटणार; राजकारणात खळबळ

ओमराजे फुटले, 15 हजार फॉलोअर्स घटले, सोशल मीडियावर ओमराजेंविरोधात संताप

फुलांच्या वर्षावात, राजाभाऊ नाशकात, कोट्यवधींची ऑफर धुडकावणारे राजाभाऊ, ठाकरेंच्या निष्ठावानानं फोडलं ऑपरेशन टायगरचं बिंग

SCROLL FOR NEXT