भारताने न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे सामन्यात २२ धावांनी विजय मिळवला. या विजयाचे खरे शिल्पकार कोण? saam tv
Sports

Ind vs NZ : श्रेयस, इशान किशन-अक्षर पटेल नाही... हे दोघे टीम इंडियाच्या विजयाचे खरे हिरो, गावसकरांनी थेट नावं सांगितली

sunil gavaskar praises arshdeep singh and mohammed siraj : भारतीय संघानं पाचव्या आणि अखेरच्या निर्णायक वनडेत न्यूझीलंडचा २२ धावांनी पराभव केला. या विजयाचं श्रेय महान क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी दोन खेळाडूंना दिलंय.

Nandkumar Joshi

भारतीय क्रिकेट संघानं न्यूझीलंडविरुद्धच्या पाचव्या वनडे सामन्यात २२ धावांनी विजय मिळवून ३-१ ने मालिका जिंकली. भारताचा एकही फलंदाज संपूर्ण मालिकेत शतक ठोकू शकला नाही. विशेष म्हणजे ४ डावांमध्ये शंभर धावाही करू शकला नाही. अखेरच्या सामन्यात तर, भारतीय संघानं कसाबसा २०० धावांचा पल्ला गाठला. २०९ धावांचा बचाव भारतीय गोलंदाज करू शकत नाहीत, असंच सुरुवातीला वाटलं होतं. पण दोन खेळाडू असे होते की त्यांनी आधी फलंदाजी आणि नंतर गोलंदाजीत योगदान देऊन भारतीय संघाच्या विजयात मोठा वाटा उचलला. भारताचे महान फलंदाज सुनील गावसकर यांनी विजयाच्या त्या दोन शिल्पकारांची थेट नावं घेतली.

त्या दोघांची भागीदारी महत्वाची...

प्रथम फलंदाजी करताना भारताचे आघाडीचे फलंदाज ढेपाळले होते. भारतीय संघ २०० धावा तरी करणार का, असा प्रश्न पडला होता. त्याचवेळी अखेरच्या विकेटसाठी अर्शदीप सिंग आणि मोहम्मद सिराज यांनी २६ धावांची भागीदारी रचली. ती विजयात निर्णायक ठरली, असं सुनील गावसकर म्हणाले. अर्शदीप आणि सिराजच्या भागीदारीनं भारतीय संघाला आव्हानात्मक धावसंख्या उभारता आली. त्यांच्यामुळेच भारत २०९ धावांपर्यंत पोहोचला होता. २१० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा संघ १८७ धावांवर गारद झाला. भारतानं हा सामना २२ धावांनी जिंकला. त्यामुळे अर्शदीप आणि सिराज यांनी १४-१४ धावांची केलेली खेळी खूपच महत्वाची होती, असं गावसकरांचं म्हणणं आहे.

अर्शदीप-सिराजच्या भागीदारीमुळंच भारतीय संघाला विजय मिळाला, असे स्पष्ट मत गावसकर यांनी व्यक्त केले. प्रतिस्पर्धी संघाचे वेगवान गोलंदाज अखेरची षटके टाकत असताना चेंडूला अतिरिक्त उसळीही मिळत होती. अशा स्थितीत या दोघांनी संयमी फलंदाजी केली. गावसकर यांनी या दोघांचे कौतुकही केले. धावा काढताना दोघांमध्ये कुठलाही संभ्रम झालेला दिसला नाही. भारताने या दोघांच्या फलंदाजीच्या जोरावर २०० धावांचा टप्पा पार केला.

गावसकर म्हणाले की, यामुळे ड्रेसिंग रुममधलं वातावरणही चांगलं होतं. प्रत्येक जणाच्या चेहऱ्यावर हसू येते किंवा ते आनंदी होतात. ज्यावेळी दहाव्या आणि अकराव्या क्रमांकावर फलंदाजी करणारे षटकार मारतात, त्यावेळी आणखी चांगलं वाटतं. एकूणच संघाचा मूड रिफ्रेश होतो. सिराजनं त्याच्या छोट्याशा इनिंगमध्ये एक चौकार आणि एक षटकार ठोकला. अर्शदीपने दोन षटकार लगावले. त्यावरही गावसकरांनी भाष्य केले. या दोघांनी चांगले फटके मारले. त्यांच्याकडे फलंदाजीसाठी लागणारं शुद्ध तंत्रज्ञान नाही, पण ते फलंदाजीचा आनंद घेतात. विशेषतः ५० षटकांच्या खेळात. फक्त बॅट फिरवायची आहे, मग कितीही धावा मिळो. नेमकं यांच्याबाबतीत तेच झालं. इतकेच नाही तर गोलंदाजीत अर्शदीप याने तीन विकेट, तर सिराजने दोन विकेट घेतल्या. त्यामुळे भारताचा विजय निश्चित झाला, असंही गावसकर म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maratha Reservation: ५८ लाख नोंदी महाराष्ट्राच्या की मराठवाड्याच्या? मराठा संघटनांचा सरकारला थेट सवाल!

Maharashtra News Live Update: राजस्थानमधून आलेल्या २० हजार मेंढ्या अन् १०० उंटांना महाराष्ट्राच्या सीमेवर रोखले

Sonali Kulkarni Latest Photos: गुलाबी साडीमध्ये 'अप्सरा' अवतरली, सोनालीचे फोटो पाहून तुमच्याही काळजाचा ठोका चुकेल

Crime: बदलापूर हादरले! मध्यरात्री रस्त्यात अडवून तरुणाची हत्या, कोयत्याने सपासप वार करत संपवलं

जे. पी. नड्डा यांच्या ताफ्यावर हल्ला करणारा मुख्य आरोपीला अटक; TMC नेत्याची पोलिसांनी काढली धिंड

SCROLL FOR NEXT