mohammed shami saam tv
Sports

Viral Video: हलक्यात घेणाऱ्या शमीचा धमाका! पहिल्याच बॉलवर यंगला इंगा दाखवत उडवल्या त्रिफळा, Video

Mohammed Shami, IND vs NZ: या सामन्यातील पहिल्याच चेंडूवर मोहम्मद शमीने विकेट मिळवला आहे.

Ankush Dhavre

Mohammed Shami Bowling:

भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना सुरू आहे. धरमशाळेतील हिमाचल क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर सुरू असलेल्या या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

या सामन्यासाठी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला भारतीय संघात स्थान दिलं गेलं आहे. दरम्यान गोलंदाजीला येताच त्याने भारतीय संघाला विकेट मिळवून दिली आहे .

सामच्या बातम्या Whatsapp वर मिळवण्यासाठी आत्ताच या लिंकवर क्लिक करा

या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान नाणेफेक झाल्यानंतर रोहित शर्माने, मोहम्मद शमी वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतील पहिला सामना खेळणार असल्याची माहिती दिली.

प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या न्यूझीलंडला ९ धावांवर पहिला धक्का बसला. डेवोन कॉनवे शून्यावर माघारी परतला. डेवोन कॉनवे बाद झाल्यानंतर मोहम्मद शमीने न्यूझीलंडला दुसरा धक्का दिला. (Latest sports updates)

तर झाले असे की, न्यूझीलंड संघाची फलंदाजी सुरू असताना भारतीय संघाकडून नववे षटक टाकण्यासाठी मोहम्मद शमी गोलंदाजीला आला होता. त्यावेळी विल यंग फलंदाजी करत होता. शमीने टाकलेला चेंडू यंगला कळालाच नाही.त्यामुळे चेंडू थेट यष्टीला जाऊन धडकला. विल यंग या डावात २७ चेंडूंचा सामना करून १७ धावा करत माघारी परतला.

या सामन्यासाठी अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११:

भारतीय संघ:

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, रविंद्र जडेजा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.

न्यूझीलंडचा संघ:

डेवॉन कॉनवे, विल यंग, ​​रचिन रविंद्र, डॅरिल मिशेल, टॉम लेथम (कर्णधार,यष्टीरक्षक), ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, मिशेल सॅन्टनर, मॅट हेन्री, लॉकी फर्ग्युसन, ट्रेंट बोल्ट

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यात पोलिस भरती प्रक्रिया थांबवणार

Attractive Womens Qualities: आकर्षक दिसणाऱ्या महिलांमध्ये कोणते गुण असतात?

Gold Rate Today : आजही सोन्याचे दरात मोठी घसरण, प्रति तोळा 'इतक्या' रूपयांवर घसरलं, वाचा 24, 22 आणि 18k ताजे दर

Fertility Problems: करिअरच्या नादात मोठी चूक? नोकरी करणारे ६०% कपल्स प्रजननाच्या आरोग्य तपासणीकडे फिरवतात पाठ

EPFOमध्ये बँक अकाउंट अपडेट कसं करायचं? वाचा स्टेप बाय स्टेप प्रोसेस

SCROLL FOR NEXT