India vs Bangladesh 1st Test Playing XI: भारत आणि बांगलादेश या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेतील दोन्ही सामन्यांमध्ये भारतीय संघाने शानदार खेळ करत कसोटी मलिका २-० ने खिशात घातली.
आता भारतीय संघासमोर न्यूझीलंड संघाचं आव्हान असणार आहे. १६ ऑक्टोबरपासून दोन्ही संघांमध्ये कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. दरम्यान मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी कोणत्या ११ खेळाडूंना संधी मिळू शकते? जाणून घ्या.
बांगलादेशविरुद्ध झालेल्या मालिकेत भारतीय संघ पूर्ण ताकतीने उतरला होता. मात्र या मालिकेत मोहम्मद सिराज किंवा जसप्रीत बुमराहपैकी एका गोलंदाजाला विश्रांती दिली जाऊ शकते. तर एका फिरकी गोलंदाजाला संधी दिली जाऊ शकते.
यापूर्वी बांगलादेशविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत कुलदीप यादव आणि अक्षर पटेल यांना विश्रांती दिली गेली होती. आता न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी दोघांपैकी एकाला संधी दिली जाऊ शकते. न्यूझीलंडचे फलंदाज फिरकी गोलंदाजांविरुद्ध खेळताना संघर्ष करताना दिसून येतात.
बांगलादेशविरुद्ध झालेल्या दोन्ही सामन्यांमध्ये सरफराज खानला प्लेइंग ११ मध्ये खेळण्याची संधी दिली गेली नव्हती. त्यानंतर इराणी कपमध्ये तो मुंबईकडून खेळण्यासाठी उतरला होता. रेस्ट ऑफ इंडियाविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने शानदार दुहेरी शतकी खेळी केली होती. याच वर्षी इंग्लंडविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत त्याला पदार्पण करण्याची संधी मिळाली होती. या मालिकेतही त्याने शानदार फलंदाजी केली होती.
केएल राहुलच्या कमबॅकनंतर सरफराज खानला संधी मिळणं कमी झालं. बांगलादेशविरुद्ध झालेल्या दोन्ही सामन्यांमध्ये केएल राहुलला संधी दिली गेली होती. आता असं म्हटलं जातंय की, केएल राहुलला विश्रांती देऊन सरफराज खानला संधी दिली जाऊ शकते.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.