kl rahul twitter
Sports

KL Rahul: WC पराभवाचा व्हिलन ते Champions Trophyचा हिरो! टीम इंडिया जिंकताच केएल राहुलचे डोळे पाणावले- VIDEO

KL Rahul Emotional Video: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्यानंतर केएल राहुलचे डोळे पाणावले, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

Ankush Dhavre

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेतील फायनलचा सामना भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये पार पडला. हा सामना जिंकून भारतीय संघाने इतिहास घडवला. भारतीय संघाने तिसऱ्यांदा ही ट्रॉफी उंचावली आहे.

ही ट्रॉफी जिंकून देण्यात ११ खेळाडूंनी मोलाची भूमिका बजावली. दरम्यान जेव्हा विकेट्स पडत होते, त्यावेळी केएल राहुलने एक बाजू धरुन ठेवली होती. हा सामना जिंकल्यानंतर केएल राहुलचेही डोळे पाणावले.

२०२३ वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या पराभवाचा व्हिलन

यापूर्वी भारतीय संघाने आयसीसी वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतील फायनलमध्येही दमदार खेळ करुन दाखवला होता. या स्पर्धेत भारताने साखळी फेरीतील सर्व सामने जिंकले होते, मात्र फायनलमध्ये भारताला ऑस्ट्रेलियाकडून पराभवाचा सामना करावा लागला होता.

या सामन्यानंतर केएल राहुलला जोरदार ट्रोल केलं गेलं होतं. कारण या सामन्यात त्याने १०७ चेंडूंचा सामना करत त्याने ६१.७ च्या स्ट्राईक रेटने ६६ धावा केल्या होत्या. या स्लो इनिंगमुळे त्याला पराभवाचा व्हिलन ठरवण्यात आलं होतं. मात्र आता तो भारतीय संघाच्या विजयाचा हिरो ठरला आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या विजयाचा हिरो

या स्पर्धेत भारतीय संघ जेव्हा जेव्हा अडचणीत सापडला, तेव्हा तेव्हा केएल राहुलने महत्वपूर्ण खेळी करुन भारतीय संघाच्या विजयात मोलाचं योगदान दिलं. यापूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या सामन्यातही भारतीय संघाचा डाव गडगडला होता, त्यावेळी केएल राहुलने षटकार मारुन भारतीय संघाला विजय मिळवून दिला होता.

न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यातही भारतीय संघाचा डाव गडगडला होता, मात्र केएल राहुलने एक बाजू धरुन ठेवली आणि भारतीय संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. या सामन्यात त्याने ३३ चेंडूंचा सामना करत नाबाद ३४ धावांची खेळी केली. जडेजान जेव्हा चौकार मारुन भारतीय संघाला विजय मिळवून दिला, त्यावेळी केएल राहुलचे डोळे पाणावलेले दिसून आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी मोठी बातमी; मुंबई-गोवा महामार्गावर ‘या’ वाहनांना बंदी

India Waterfall : धबधब्याचं पाणी चक्क आकाशाकडे जातं! भारतातच पाहायला मिळतो निसर्गाचा 'हा' अद्भुत चमत्कार

Maharashtra News Live Update: दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंगमध्ये दोन गटात तुफान दगडफेक

विकासकामांच्या नावाखाली 100 कोटींचा घोटाळा? नगरसेविकेची थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

BJP Vs MNS : कल्याण-डोंबिवलीचं राजकारण तापलं! सत्ताधारी भाजप-मनसेतच जुंपली; काळेंची टीका, म्हात्रेंचा इशारा

SCROLL FOR NEXT