वेलिंग्टनच्या बेसिन रिझर्व्ह मैदानावर भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिली टेस्ट मॅच खेळवली जातेय. या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच न्यूझीलंडच्या फलंदाजांवर दबाव निर्माण केला. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने टॉम ब्लंडेलला आऊट करत न्यूझीलंडला पाचवा धक्का दिला. अवघ्या 70 रन्समध्ये न्यूझीलंडची निम्मी टीम माघारी परतल्याने टीमची अवस्था कठीण झाली आहे.
भारताने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बुमराहने पहिल्याच ओव्हरमध्ये भारताला मोठं यश मिळवून दिलं. ओव्हरमधील पहिल्या चेंडूवर डेव्हॉन कॉन्वेने एक रन काढला. त्यानंतर टॉम लॅथम फलंदाजीसाठी आला. बुमराहने टाकलेला तिसरा चेंडू अप्रतिम होता. लॅथमला वाटलं की, चेंडू बाहेरच्या दिशेने जात आहे. त्यामुळे त्याने तो सोडून दिला. पण चेंडू जमिनीवर पडताच आतल्या बाजूला वळला आणि थेट स्टंपवर जाऊन आदळला. त्यामुळे लॅथमला काही समजण्याआधीच त्याला तंबूत परतावं लागलं.
न्यूझीलंडच्या टीमने 70 रन्सवर पाच विकेट गमावल्या होत्या. भारताकडून जसप्रीत बुमराहने आतापर्यंत तीन विकेट घेतल्या आहेत. त्याने टॉम लॅथम, डॅरिल मिचेल आणि टॉम ब्लंडेल यांना बाद केलं. तर डेव्हॉन कॉनवेला अंशुल कंबोजने आणि रचिन रवींद्रला आकाश दीपने बाद केलं. भारतीय गोलंदाजांच्या या कामगिरीमुळे न्यूझीलंडच्या फलंदाजांना रन्स करणं कठीण झालं आहे. दरम्यान ७० रन्सवर ५ विकेट्स गमावल्यानंतर हेन्री निकोल्स आणि ग्लेन फिलिप्स यांनी न्यूझीलंडचा डाव सावरला. दोघांनीही संयमी फलंदाजी करत भारतीय गोलंदाजांचा सामना केला.
सुरुवातीला अडचणीत सापडलेल्या न्यूझीलंडला या जोडीने दमदार कमबॅक करून करून दिलंय. ७० रन्सवर ५ विकेट्स अशी बिकट अवस्था असलेल्या न्यूझीलंडचा स्कोर आता २२३ रन्सच्या पुढे पोहोचलाय. भारताच्या गोलंदाजांसमोर या जोडीला रोखण्याचं आव्हान आहे.
केएल राहुल, यशस्वी जयस्वाल, देवदत्त पडिक्कल, शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, ध्रुव जुरेल, आकाश दीप, अंशुल कंबोज, जसप्रीत बुमराह आणि प्रसिद्ध कृष्णा.
टॉम लॅथम (कर्णधार), डेव्हॉन कॉनवे, हेन्री निकोल्स, रचिन रवींद्र, डॅरिल मिचेल, टॉम ब्लंडेल (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, नॅथन स्मिथ, काइल जेमिसन, मॅट हेन्री आणि जेकब डफी.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.