MS Dhoni Thala For A Reason Saam Tv
Sports

MS Dhoni : भारतानं ट्रॉफी धोनीमुळे जिंकली! नेटकऱ्यांचं म्हणणं अन् 'थाला फॉर अ रिजन' चा ट्रेंड; कारण जाणून व्हाल थक्क

Ind Vs Nz Highlights : चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडचा ४ गडी राखून पराभव केला. पण या दरम्यान सोशल मीडियावर थाला फॉर अ रिजन या संबंधित अनेक मीम्स, पोस्ट व्हायरल व्हायला सुरुवात झाली.

Yash Shirke

Mahendra Singh Dhoni : टीम इंडियाने काल चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चे विजेतेपद मिळवले. अंतिम सामन्यामध्ये भारताने न्यूझीलंडचा ४ गडी राखून पराभव केला. २०१३ मध्ये भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. तब्बल १२ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरले. याच दरम्यान भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी चर्चेत आला आहे.

एमएस धोनीने २०२० मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. तो सध्या आयपीएलमध्ये खेळताना दिसतो. दिवसेंदिवस धोनीच्या फॅन फॉलोइंगमध्ये वाढ होत असल्याचे पाहायला मिळते. चाहते त्याला प्रेमाने थाला म्हणतात. काही महिन्यांपूर्वी धोनीला जोडून 'थाला फॉर अ रिजन' हा ट्रेंड व्हायरल झाला. यात धोनी, थाला आणि सात नंबर यांचा संबंध एकमेकांशी जोडला गेला. योगायोगाने याचे कनेक्शन चाहत्यांनी चॅम्पियन्स ट्रॉफीशी लावले आहे.

भारताने काल तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. १९८३ पासून आतापर्यंत भारताने आयसीसीचे दोन वनडे वर्ल्डकप, तीन चॅम्पियन्स ट्रॉफी आणि दोन टी-२० वर्ल्डकप जिंकले आहेत. २+३+२ अशी बेरीज ७ अशी होती. या गणितावरुन नेटकरी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ जिंकण्याचे कनेक्शन एमएस धोनीशी असल्याचे म्हणत आहेत. त्यावरुन अनेक मीम्स व्हायरल होत आहेत.

एमएस धोनी हा भारताच्या सर्वोत्कृष्ट कर्णधारांपैकी एक आहे. त्याच्या कारकीर्दीमध्ये भारताने २००७ मध्ये टी-२० वर्ल्डकप, २०११ मध्ये वनडे वर्ल्डकप आणि २०१३ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. निवृत्ती घेतल्यानंतर तो फक्त आयपीएलमध्ये दिसत आहे. त्याच्या नेतृत्वामध्ये सीएसकेने पाच वेळा विजेतेपद मिळवले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai-Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गावर भीषण वाहतूक कोंडी, वाहनांच्या लांबच लांब रांगा, प्रवाशांना मोठा मनस्ताप|VIDEO

Samsung Diwali Sale: सॅमसंगची धासू ऑफर, Galaxy S24 FE दिवाळीच्या सेलमध्ये अर्ध्या किमतीत

Maharashtra Live News Update : बदलापुरात 17 हजार बोगस मतदार

सकाळचा एक कप चहा पाहा तुमचं किती नुकसान करतोय

Narak Chaturdashi: नरक चतुर्दशीला कोणत्या देवाचे पूजन करतात? आणि किती दिवे लावावे? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT