Team India Saam Tv
क्रीडा

INDvsNZ 3rd ODI : टीम इंडिया इंदूरमधील मैदानावर अजिंक्य, पाहा रेकॉर्ड्स; सामना फ्रीमध्ये कुठे पाहता येईल?

भारताची नजर सलग दुसऱ्या मालिकेत क्लीन स्वीपकडे असेल.

साम टिव्ही ब्युरो

INDvsNZ 3rd ODI :भारत आणि न्यूझीलंड  यांच्यातील तीन एकदिवसीय मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना आज इंदूरमध्ये खेळवला जाणार आहे. टीम इंडिया 2017 नंतर होळकर क्रिकेट स्टेडियमवर खेळणार आहे. या मैदानावर टीम इंडियाचा कधीही पराभव झालेला नाही.

भारताने आज न्यूझीलंडला पराभूत केल्यास 3-0 ने मालिका विजय साजरा करेल.टीम इंडियाने मालिकेतील पहिला सामना हैदराबादमध्ये 12 धावांनी तर दुसरा सामना रायपूरमध्ये 8 विकेटने जिंकला होता. भारताची नजर सलग दुसऱ्या मालिकेत क्लीन स्वीपकडे असेल.

गेल्या मालिकेत त्याने श्रीलंकेचा 3-0 असा पराभव केला होता. 2010 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध मायदेशात भारताने शेवटचे सर्व सामने जिंकले होते. त्यानंतर पाच सामन्यांची मालिका 5-0 अशी जिंकली. त्या मालिकेत गौतम गंभीर टीम इंडियाचा कर्णधार होता. (Latest Marathi News)

इंदूरमध्ये भारताची कामगिरी

>> भारत विरुद्ध इंग्लंड - भारत 7 विकेट्सने विजयी (2006)

>> भारत विरुद्द इंग्लंड - भारत 54 धावांनी विजयी ( 2008)

>> भारत विरुद्ध वेस्ट इंडिज - भारत 153 धावांनी विजयी (2011)

>> भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका - भारत 22 धावांनी विजयी (2015)

>> भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया - भारत 5 विकेट्सने जिंकला (2017)

सामना कधी सुरू होईल?

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसरा एकदिवसीय सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता खेळवला जाईल.

सामना कुठे पाहता येईल?

स्टार स्पोर्ट्स नेटवर्ककडे भारत आणि न्यूझीलंड एकदिवसीय मालिका प्रसारित करण्याचे अधिकार आहेत. हा सामना तुम्ही स्टार स्पोर्ट्सच्या वेगवेगळ्या चॅनेलवर हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त इतर भाषांमध्ये कॉमेंट्रीसह पाहू शकता.

फोन किंवा लॅपटॉपवर लाईव्ह मॅच कशी बघायची?

हॉटस्टार अॅपवर या सामन्याचे लाईव्ह-स्ट्रीमिंग पाहता येईल.

लाइव्ह मॅच मोफत कशी बघायची?

या सामन्याचे थेट प्रक्षेपण तुम्ही डीडी स्पोर्ट्स चॅनलवर डीडी फ्री डिशवर पाहू शकता. यासाठी कोणतेही शुल्क लागत नाही. तुमच्या घरी टाटा स्काय कनेक्शन असल्यास, तुम्ही टाटा प्ले अॅपवरही सामना पाहू शकता. यासाठी तुम्हाला अतिरिक्त शुल्क देखील लागणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs AUS: बुमराह बॅटिंगला आला अन् रिषभ गोलंदाजीला; BCCI ने शेअर केला दोघांच्या जुगलबंदीचा VIDEO

Maharashtra News Live Updates: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कराडमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांकडून निषेध

Assembly Election: बल्लारपूरमध्ये रंगणार तिरंगी लढत; सुधीर मुनगंटीवारांपुढे काँग्रेसच्या संतोष सिंह रावतांचं आव्हान

IND vs SA: निर्णायक सामन्यात टीम इंडियाचा टॉस जिंकत बॅटिंगचा निर्णय; पाहा प्लेइंग 11

World : जगातील सर्वात मोठे नदी बेट कोणते? हनिमूनसाठी सर्वात रोमँटिक ठिकाण

SCROLL FOR NEXT