IND vs NZ 3rd ODI Playing 11
IND vs NZ 3rd ODI Playing 11 SAAM TV
क्रीडा | IPL

IND vs NZ 3rd ODI Playing 11: न्यूझीलंडविरुद्ध तिसऱ्या वनडेत पंत की सॅमसन? 'अशी' असेल प्लेइंग ११

Nandkumar Joshi

IND vs NZ 3rd ODI Playing 11 Prediction : भारतीय क्रिकेट संघ न्यूझीलंडविरुद्ध बुधवारी तिसरा वनडे सामना खेळणार आहे. या सामन्यात विजय मिळवण्याच्या इराद्याने टीम इंडिया मैदानात उतरेल. मालिका जिंकण्याची संधी दुसऱ्या वनडे सामन्यानंतरच हुकली आहे. हॅमिल्टनमध्ये सामना पावसामुळं रद्द करावा लागला होता.

न्यूझीलंडनं पहिल्या सामन्यात विजय मिळवून मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे. ख्राइस्टचर्चमध्ये होणाऱ्या तिसऱ्या सामन्यात भारतानं विजय मिळवला तर मालिका बरोबरीत सुटेल. भारतासाठी ही लढत महत्वाची आहे. अशात प्लेइंग इलेव्हनमध्ये कुणाला संधी मिळेल, याबाबत उत्सुकता आहे.(Latest Marathi News)

न्यूझीलंड दौऱ्यात वनडे संघाचं कर्णधारपद शिखर धवनकडे आहे. आपल्या नेतृत्वाखाली संघाला पराभवापासून वाचवण्याचे आव्हान शिखर धवनपुढे असणार आहे. दुसरीकडे, मालिकेत पराभव होऊ नये यासाठी व्हीव्हीएस लक्ष्मणही पूर्ण प्रयत्न करणार हे नक्की. पावसामुळं हा सामनाही रद्द झाला तर भारतासाठी हा मोठा धक्का असणार आहे. कारण या मालिकेत भारताचा पराभव होईल. (Sports News)

पंतला बाहेरचा रस्ता?

भारतानं दुसऱ्या सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल केले होते. संघात सहाव्या गोलंदाजाचा पर्याय घेतला होता. दीपक हुड्डाला त्या सामन्यात संधी दिली होती. मात्र, टीम इंडियाला टीकेचा सामना करावा लागला होता. हुड्डाला घेण्यासाठी टीम इंडियानं संजू सॅमसनला बाहेर बसवले होते. त्याचवेळी रिषभ पंतला संघात घेतलं होतं. पंत सातत्याने अपयशी ठरत आहे. अशावेळी त्याला वारंवार संधी देणे कितपत योग्य आहे, असं टीकाकारांचे म्हणणे आहे. तर संजू सॅमसनला संधी मिळत नाही म्हणून चाहते चिडले होते.

पंतला संधी आणि संजू सॅमसनला संघाबाहेर ठेवण्यावरून सातत्याने टीका झेलावी लागत असल्याने तिसऱ्या सामन्यात काही बदल होतो का, हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे. आता तिसऱ्या सामन्यात शिखर धवन टीम इंडिया प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करणार का? सॅमसनला संधी मिळेल की पंतला कायम ठेवणार यावर सर्वांचे लक्ष असणार आहे.

भारताची संभाव्य प्लेइंग ११

शिखर धवन (कर्णधार), शुभमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, संजू सॅमसन, दीपक हुड्डा, वॉशिंग्टन सुंदर, दीपक चाहर, उमरान मलिक, अर्शदीप सिंग, युजवेंद्र चहल

न्यूझीलंड संघ प्लेइंग ११

केन विलियमसन, फिन एलन, डेवन कॉनवे, डॅरेल मिचेल, टॉम लॅथम, ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर, मिचेल ब्रेसवेल, एडम मिल्ने, मॅट हेनरी, टीम साउदी, लॉकी फर्ग्युसन

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bihar Wedding Viral News : अजब-गजब प्रेम कहाणी: विधूर जावयासोबत सासऱ्यानेच लावलं बायकोचं लग्न

May Month Horoscope: या राशींसाठी येणारे 30 दिवस ठरतील वरदान, मेष राशीत मंगळाचा प्रवेश ठरणार लाभदायक

Lok Sabha Election: पहिल्या दोन टप्प्यात भाजपला कमी मतदान? प्रचारासाठी आता BJP ने तयार केला नवीन गेम प्लॅन?

Kalyan Lok Sabha: राज ठाकरेंचे जे विचार आहेत, तेच आमचे विचार, मनसे शिवसेनेचा डीएनए एकच: श्रीकांत शिंदे

Health Tips: महिलांसाठी मेथीचे पाणी ठरते वरदान, का प्यावे घ्या जाणून...

SCROLL FOR NEXT