ind vs nz 2nd t20: Hardik Pandya can give chance to this player SAAM TV
Sports

IND vs NZ 2nd T20: मालिकेत बरोबरी साधण्यासाठी हार्दिकचा नवा प्लॅन, संघात या खेळाडूची एंट्री!

IND vs NZ 2nd T20: दुसरा टी-२० सामना आज २९ जानेवारीला सायंकाळी लखनऊच्या मैदानावर खेळवला जाणार आहे.

Chandrakant Jagtap

IND vs NZ 2nd T20: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांची टी-२० मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात टीम इडियाला न्यूझीलंडकडून मोठा पराभव स्विकारावा लागला. त्यामुळे आता दुसऱ्या सामन्यात (India vs New Zealand 2nd T20) विजय मिळवून या मालिकेत बरोबरी साधण्याचा हार्दिक पांड्याच्या संघाचा प्रयत्न असेल. दुसरा टी-२० सामना आज २९ जानेवारीला सायंकाळी लखनऊच्या मैदानावर खेळवला जाणार आहे.

पहिल्या टी-२० सामन्यात भारताची गोलंदाजी आणि फलंदाजी अशा दोन्ही विभागातील कामगिरी समाधानकारक नव्हती. त्यामुळे संघाला २१ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. आता या मालिकेत बरोबरी साधण्यासाठी कर्णधार हार्दिक पंड्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करण्याची शक्यता आहे. हार्दिक एका स्टार खेळाडूचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करू शकतो.

या स्फोटक खेळाडूला मिळू शकते संधी

पहिल्या टी-२० सामन्यात टीम इंडियाच्या फलंदाजांना चांगली कामगिरी करता आली नाही. सुर्यकुमार यादव आणि वॉशिंग्टन सुंदरसोडता कोणत्याही फलंदाजाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. त्यामुळे दुसऱ्या सामन्यात कर्णधार हार्दिक पंड्या स्फोटक फलंदाज जितेश शर्माला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देऊ शकतो. तो उत्कृष्ट फॉर्ममध्ये असून तो उत्कृष्ट यष्टिरक्षण देखील करतो.

स्पोटक फलंदाजीसाठी प्रसिद्ध

आयपीएलमध्ये जितेश शर्माने पंजाब किंग्जकडून खेळताना आपली छाप सोडली आहे. त्याने पंजाबकडून 12 सामन्यांत 234 धावा केल्या आहेत. दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध 34 चेंडूत 44 धावांची खेळी खेळून त्याने सर्वांना प्रभावित केले आहे. त्यामुळे न्यूझीलंडविरुद्ध दुसऱ्या टी-२० सामन्यात हार्दिक पांड्या त्याला संधी देऊ शकतो.

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये चमकदार कामगिरी

जितेश शर्माने 2013-14 विजय हजारे ट्रॉफीमध्ये आपले लिस्ट ए मध्ये पदार्पण केले. त्याने पहिल्या दोन हंगामात विदर्भासाठी केवळ मर्यादित षटकांचे सामने खेळले. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2015-16 मध्ये तो तिसरा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला. त्याने एक शतक आणि दोन अर्धशतकांसह 143.51 च्या स्ट्राइक रेटने 343 धावा केल्या होत्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rain Alert : वाशिम जिल्ह्यात तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा; अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस

Maharashtra Live News Update : बीडमध्ये क्लासेसमधील मुलींचे लैंगिक छळ प्रकरण; दुसरा गुन्हा दाखल

Harbour Line : हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत; रविवारच्या दिवशी प्रवाशांचे मेगा हाल

Ashadh Wari: विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल" जयघोषात पुण्याचे प्रतिपंढरपूर भक्तिरसात न्हालं|VIDEO

Early Morning Dreams: सकाळी पडणारे स्वप्न खरंच पूर्ण होतात का?

SCROLL FOR NEXT