Team India Saam Tv
Sports

Ind Vs New Zealand Series: टीम इंडियाला मोठा झटका! न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतून धडाकेबाज खेळाडू OUT

उद्यापासून एकदिवसीय सामन्याला सुरूवात होणार आहे. त्याआधीच भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे.

Gangappa Pujari

Ind Vs New Zealand Series: टी ट्वेंटी आणि एकदिवसीय मालिकेत श्रीलंकेला धुळ चारल्यानंतर भारतीय संघ आता न्यूझीलंडविरुद्ध दोन हात करणार आहे. न्यूझीलंडविरुद्ध (New Zeland) तीन टी ट्वेंटी आणि तीन एकदिवसीय सामने होणार आहेत. उद्यापासून एकदिवसीय सामन्याला सुरूवात होणार आहे. त्याआधीच भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे.

दुखापतीमुळे मधल्या फळीतील धडाकेबाज फलंदाज श्रेयस अय्यर या मालिकेतून बाहेर पडला आहे. बीसीसीआयने याबाबत ट्विट करत माहिती दिली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, भारत दौऱ्यावर आलेल्या न्यूझीलंड संघाविरुद्ध उद्यापासून पहिला एकदिवसीय सामना रंगणार आहे. त्याआधी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. दुखापतीमुळे श्रेयस अय्यर संघातून बाहेर पडणार असल्याची माहिती बीसीसीआयने दिली आहे. याबद्दलचे अधिकृत ट्विट बीसीसीआयने केले आहे.

दुखापतीमुळे श्रेयस अय्यरला बाहेर पडावे लागल्यानंतर रजत पाटीदारला संघात स्थान देण्यात आले आहे.

गेल्यावर्षी ठोकल्या होत्या सर्वाधिक धावाः

मागचे वर्ष श्रेयस अय्यरसाठी जोरदार ठरले होते. २०२२ मध्ये श्रेयस अय्यरने एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाकडून सर्वाधिक धावा ठोकल्या होत्या. ज्यामध्ये १७ सामन्यांत ७२४ धावांचा समावेश होता. मात्र हे वर्ष श्रेयस अय्यरसाठी काही खास राहिले नाही.

श्रीलंकेविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यात श्रेयसने २८,२८ आणि ३८ अशा धावा ठोकल्या होत्या. त्यानंतर आता त्याला न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेलाही मुकावे लागणार आहे.

श्रेयसच्या संधी मिळालेला रजत पाटीदारनेही त्याच्या चमकदार कामगिरीने निवडसमितीचे लक्ष वेधले होते. मुख्यफळीतील फलंदाज असलेल्या २७ वर्षीय रजतने मध्यप्रदेशकडून प्रथम श्रेणी सामने खेळताना ८ डावांत एका शतकासह चार अर्धशतके ठोकली आहेत. याच कामगिरीच्या जोरावर त्याला न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत संधी देण्यात आली आहे. (BCCI)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : तोलून मापून आणि कोणत्याही घटकाला नाराज न करता काम करणे गरजेचे, अजित पवारांचा सल्ला

Trendy Blouse Design: सणासाठी साडी नेसायची असेल तर, असे ब्लाउज आत्ताच तयार करा

Diwali 2025: नरक चतुर्दशीला कारिट फळ का फोडतात? कारणे आहे खास

Liver Detox: लिव्हर डिटॉक्स करण्यासाठी करा 'हे' सोपे उपाय, आरोग्य सुधारेल

Gulgule Recipe: नाश्त्याला काय करायचं सूचत नाही? ही गोड गुलगुल्यांची झटपट रेसिपी ट्राय करा

SCROLL FOR NEXT