Jasprit Bumrah News Saam TV
क्रीडा

IND vs IRE 1st T20I: आयर्लंडच्या विरोधात जसप्रीत बुमराहचं जोरदार कमबॅक, टीम इंडियाची विजयी सुरुवात

IND vs IRE 1st T20I: सामनादरम्यान पाऊस आल्याने डकवर्थ लुईस नियमानुसार टीम इंडिया जिंकली. या मालिकेची सुरुवात टीम इंडियाने केली.

Vishal Gangurde

IND vs IRE 1st T20I: भारत विरुद्ध आयर्लंडचा तीन सामन्यांची मालिका डबलिनमध्ये झाला. या सामन्यात कर्णधार जसप्रीत बुमराहने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. आयर्लंडने भारताला १४० धावांचे आव्हान दिले होते. सामनादरम्यान पाऊस पडल्याने डकवर्थ लुईस नियमानुसार टीम इंडिया जिंकली. या मालिकेत विजयी सुरुवात टीम इंडियाने केली. (Latest Marathi News)

सामन्यादरम्यान पाऊस पडल्याने डकवर्थ लुईस नियमानुसार दोन धावांनी टीम इंडियाने सामना सहज जिंकला. सामना जिंकल्यामुळे आयर्लंडच्या विरोधातील या मालिकेत टीम इंडियाने १-० ने आघाडी घेतली आहे. भारताने प्रथम गोलंदाजी घेत आयर्लंडचे पहिला पाच गडी पॉवरप्लेच्या आत तंबूत परतवले होते. (Latest Cricket News)

आयर्लंडने २० षटकात ७ गडी गमावून १३९ धावा ठोकल्या होत्या. आयर्लंडच्या बॅरीने सर्वाधिक धावा केल्या. त्याने अर्धशतक ठोकलं.

तत्पूर्वी,टीम इंडियासाठी बुमराह, कृष्णा, रविने प्रत्येकी २-२ गडी बाद केले. टीम आयर्लंडने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या टीम इंडियाचा संघ सहज सामना जिंकला. (Latest Cricket News In Marathi)

पाऊस आला त्यावेळी टीम इंडियाचे ६.५ षटकात २ गडी गमावून ४७ धावा झाल्या होत्या. पावसाचा जोर वाढल्याने डकवर्थ लुईस नियमानुसार टीम इंडियाला विजयी घोषित करण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: तिसऱ्या फेरीनंतर बुलढाण्यात कोणत्या मतदारसंघात काय स्थिती?

Chopda Vidhan Sabha : निवडणुकीचे काम टाळणाऱ्या २१ कर्मचाऱ्यांवर गुन्हा; विनापरवानगी राहिले गैरहजर

Assembly Election Results 2024 : राज्यात कोणाचं सरकार येणार? सुरुवातीच्या कलात महायुती आघाडीवर

बहुमताचा आकडा गाठला, सुरुवातीचा कल महायुतीकडे, भाजप मोठ्या भावाच्या भूमिकेत!

Cleaning Tips: ब्लँकेट रजाईला दुर्गंधी येते का? हे उपाय एकदा करून बघा

SCROLL FOR NEXT