Rishabh Pant Celebration Video saam tv
Sports

Ind vs Eng Test: लीड्सच्या मैदानावर पंतची कोलांटी उडी; ऋषभच्या सेलिब्रेशनवर सचिन-सेहवागची भन्नाट प्रतिक्रिया|VIDEO Viral

Rishabh Pant Celebration Video: लीड्स कसोटीच्या दुसऱ्या दिवशी ऋषभ पंतनं शानदार शतक झळकावलं. पंतने आपल्या स्टाइलने फलंदाजी करत कसोटीचा दुसरा दिवस आपल्या नावावर केला.

Bharat Jadhav

टीम इंडियाच्या या स्टार विकेटकीपर फलंदाजाने आपल्या स्फोटक फलंदाजीने कसोटी क्रिकेटमध्ये खूप धावा केल्या आहेत.लीड्स कसोटीच्या दुसऱ्या दिवशी ऋषभ पंतनं धमाकेदार शतक करत कसोटीचा दुसरा दिवस आपल्या नावावर केला. पंतचं फलंदाजीनं अनेकांना आर्श्चचकित केलंय. लीड्स कसोटीत पंतने आपल्या हटके स्टाइलनं फलंदाजी केली. त्याची ही फटकेबाजी अनेकांना भावली. मग एका हाताने षटकार मारणं असो किंवा स्वीप शॉटनं अनेकांना वेड लावलं. शतक केल्यानंतर पंतनं केलेलं सेलिब्रेशननं बहुतेकांना आवडलं.

लीड्स कसोटीत इंग्लंडविरुद्ध शतक झळकावून पंतने केलेलं सेलिब्रेशनवर वीरेंद्र सेहवाग आर्श्चचकित झाला. पंतनं योग दिवस साजरा केला. लीड्समध्ये सुरू झालेल्या कसोटी मालिकेतील या पहिल्या सामन्यात टीम इंडियाच्या फलंदाजांनी आपला दम दाखवला. पहिल्या दिवशी कर्णधार शुबमन गिल आणि यशस्वी जैस्वाल यांनी उत्कृष्ट शतके झळकावली.

तर दुसऱ्या दिवशी ऋषभ पंतने हा टप्पा गाठला. पहिल्या दिवशी अतिशय सावधपणे फलंदाजी करणाऱ्या पंतने दुसऱ्या दिवशीही फटकेबाजी करत शतक झळकावलं. पंतने पुढे जाऊन फिरकी गोलंदाजाला षटकार मारले, तर अनेक वेळा तो स्लॉग शॉट्स मारण्याचा प्रयत्न करताना खेळपट्टीवर पडला.

दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात पंतने त्याचे शतक पूर्ण केलं. फिरकी गोलंदाज शोएब बशीरच्या चेंडूवर पुढे जाऊन 'एका हाताने' एक लांब शॉट मारत शतक पूर्ण केलं. शतक झळकावल्यानंतर पंतनं आपलं हेल्मेट काढलं आणि नंतर हातातील बॅट जमिनीवर ठेवली. त्यानंतर कोलांटी उडी मारली. त्याच्या कोलांटी उडी पाहून अनेकजण थक्क झालेत. पंतचे शतक शानदार होतेच, तर त्याचे सेलिब्रेशन आणखी मनोरंजक होते.

पंतने अशा पद्धतीने शतक साजरे करण्याची ही दुसरी वेळ होती. यापूर्वी त्याने आयपीएल २०२५ मध्ये शतक झळकावले तेव्हा त्याने असं सेलिब्रेशन केलं होतं. पंतच्या या सेलिब्रेशनने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवाग सारख्या दिग्गजांचेही लक्ष वेधून घेतलं. पंतच्या शतकाचे कौतुक करताना तेंडुलकरने एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिले की, "पंतचा सेलिब्रेशन त्याच्या फलंदाजीइतकाच मनोरंजक आहे. शाब्बास ऋषभ."

तर सेहवागने पंतच्या या सेलिब्रेशनचे कौतुक आपल्या हटके अंदाजात केलं. त्याने त्याचा संबंध आंतरराष्ट्रीय योग दिनाशी जोडला. योग दिवस भारतासह जगभरात साजरा केला गेला. योगायोगाने त्याच दिवशी पंतनेही शतक झळकावले आणि हा मजेदार सेलिब्रेशन दाखवून सर्वांचे लक्ष वेधून घेतलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Walking Fitness Routine: खरचं १०,००० पाऊलं चालण्याने शरीरात हे चमत्कारीक बदल होतात का?

Guru Gochar 2026: 12 वर्षांनंतर गुरु करणार सूर्याच्या राशीत प्रवेश; या राशींना मिळणार चांगली नोकरी आणि पैसा

Green Chutney Recipe : 'सँडविच'ची चव वाढवणारी 'हिरवी चटणी' घरी कशी बनवाल? वाचा परफेक्ट रेसिपी

Earthquake: अमरावती पुन्हा भूकंपाच्या धक्क्यांनी हादरलं; ३ महिन्यात चौथ्यांदा जाणवले भूकंपाचे धक्के

नव्या लोखंडी कढईचा चिकटपणा काही केल्या जात नाही? या सोप्या टीप्स वापरून पाहा

SCROLL FOR NEXT