jasprit bumrah saam tv
Sports

Hardik Pandya Record: मानला रे तुला! हार्दिकने मोठ्या रेकॉर्डमध्ये जसप्रीत बुमराहला सोडलं मागे; काय आहे रेकॉर्ड?

Hardik Pandya Surpassed Jasprit Bumrah: भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने मोठ्या रेकॉर्डमध्ये जसप्रीत बुमराहला मागे सोडलं आहे.

Ankush Dhavre

कोलकात्यातील ईडन गार्डन्सच्या मैदानावर भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ टी -२० सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना पार पडला. हा सामना भारताने ७ गडी राखून आपल्या नावावर केला. यासह ५ सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली. पहिल्या डावात भारतीय गोलंदाजांनी शानदार कामगिरी केली.

आक्रमक फलंदाजांची फौज असलेल्या इंग्लंडला अवघ्या १३२ धावांवर रोखलं. भारताकडून गोलंदाजी करताना हार्दिक पंड्याने २ गडी बाद केले. यासह त्याच्या नावे एका मोठ्या रेकॉर्डची नोंद झाली आहे.

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी -२० सामन्यात वेगवान गोलंदाजीची धुरा हार्दिक पंड्या आणि अर्शदीप सिंग यांच्या हाती होती. दोघांनी शानदार सुरुवात करून दिली. हार्दिकने या डावात गोलंदाजी करताना ४ षटकात ४२ धावा खर्च केल्या आणि २ गडी बाद केले. यादरम्यान त्याने जोफ्रा आर्चर आणि जेकब बेथेलला बाद करत माघारी धाडलं.

यासह त्याने टी -२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक गडी बाद करणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत जसप्रीत बुमराह आणि भुवनेश्वर कुमारला मागे सोडलं आहे. हार्दिकने आतापर्यंत ११० टी -२० सामन्यांमध्ये ९१ गडी बाद केले आहेत. तर बुमराहच्या नावे ७० सामन्यात ८९ आणि भुवनेश्वर कुमारच्या नावे ९० गडी बाद करण्याची नोंद आहे.

असा रेकॉर्ड करणारा तिसरा भारतीय गोलंदाज

यासह हार्दिक पंड्या भारतासाठी टी -२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक गडी बाद करणारा तिसरा गोलंदाज ठरला आहे. या यादीत अर्शदीप सिंगने अव्वल स्थान झेप घेतली आहे. याआधी युझवेंद्र चहल अव्वल स्थानी होता. चहलच्या नावे ९६ गडी बाद करण्याची नोंद आहे. तर अव्वल स्थानी असलेल्या अर्शदीप सिंगने ९७ गडी बाद केले आहेत.

टी -२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक गडी बाद करणारे भारतीय गोलंदाज -

अर्शदीप सिंग -९७ गडी

युझवेंद्र चहल -९६ गडी

हार्दिक पंड्या - ९१ गडी

भुवनेश्वर कुमार- ९० गडी

जसप्रीत बुमराह - ८९ गडी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akshay Kumar : टायगर श्रॉफवरील हल्ल्याचा अक्षय कुमारने घेतला धसका? घराबाहेर वाढवली सुरक्षा

Birthday Gift Ideas: लहान मुलांच्या वाढदिवसाला देता येतील असे 5 रिटर्न गिफ्ट्स

Maharashtra News Live Update: ४०० कोटींची जमीन ५६ कोटींना देण्याचा घाट, वरळीतील भूखंडाच्या भाडेपट्ट्यावरून वाद

Aadhaar Card Update: आधार कार्ड अपडेट करायचेय? नाव, पत्ता, जन्मतारीख बदलण्यासाठी लागतील ही कागदपत्रे

District Bank Elections: सुप्रीम कोर्टाचा सहकार सम्राटांना मोठा धक्का, २० दिग्गज नेत्यांवर अपात्रतेची टांगती तलवार? यादीत कुणाची नावं?

SCROLL FOR NEXT