suryakumar yadav twitter
Sports

Suryakumar Yadav Naushad Khan: सूर्यकुमारचा एक मेसेज अन् सरफराजचे वडील पाहु शकले डेब्यू सामना; काय होता मेसेज?

Suryakumar Yadav Message: नौशाद खान हा सामना पाहण्यासाठी जाणारच नव्हते. त्यांना सूर्यकुमार यादवने समजावलं त्यानंतर त्यांनी लगेच त्यांनी राजकोट गाठलं. नेमकं काय घडलं जाणून घ्या.

Ankush Dhavre

Suryakumar Yadav Naushad Khan:

भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा कसोटी सामना राजकोटमध्ये सुरु आहे. या सामन्यात खान कुटुंबाचं स्वप्न सत्यात उतरलं आहे. देशातंर्गत क्रिकेटमध्ये धावांचा पाऊस पाडूनही सरफराज खानला भारतीय संघात संधी दिली जात नव्हती. अखेर १५ फेब्रुवारी त्याचं भारतीय संघासाठी खेळण्याचं स्वप्न पूर्ण झालं. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात त्याला कसोटी पदार्पण करण्याची संधी मिळाली आहे.

हा खास क्षण आणखी खास बनवण्यासाठी सरफराज खानचे वडील नौशाद खान आणि त्याची पत्नी रोमाना झहूर देखील मैदानावर उपस्थित होते. मात्र नौशाद खान हा सामना पाहण्यासाठी जाणारच नव्हते. त्यांना सूर्यकुमार यादवने समजावलं त्यानंतर त्यांनी लगेच त्यांनी राजकोट गाठलं. नेमकं काय घडलं जाणून घ्या.

सरफराज खान हा भारतासाठी कसोटी क्रिकेट खेळणारा ३११ वा खेळाडू ठरला आहे. कसोटी पदार्पणाची कॅप मिळताच सरफराज खान आपल्या वडिलांकडे धावत गेला आणि आपल्या वडिलांना मिठी मारली. मात्र नौशाद खान हे राजकोटला जाणारच नव्हते. नौशाद खान म्हणाले की, ' सुरुवातीला मला असं वाटलं होतं की, मी नाही जाऊ शकणार. मला वाटलं की मी तिथे गेलो तर सरफराज दबावात येईल आणि मला सर्दीही झाली होती. त्यामुळे मी जाणार नव्हतो. मात्र सूर्यकुमार यादवच्या एका मेसेजमुळे माझं मन बदललं.' (Cricket news in marathi)

काय होता सूर्यकुमार यादवचा मेसेज?

या मेसेजमध्ये त्याने लिहीले होते की, 'मी तुमची भावना समजू शकतो. पण माझ्यावर विश्वास ठेवा जेव्हा मी पदार्पण केलं होतं. ज्यावेळी मला पदार्पणाची कॅप दिली गेली त्यावेळी माझे आई- वडील माझ्या पाठी होते.' याबाबत बोलताना नौशाद खान म्हणाले की, सूर्यकुमार यादवचा मेसेज आल्यानंतर मी स्वत:ला थांबवू शकलो नाही. मी त्वरीत राजकोटला जाण्याची सोय केली.'

सरफराजला पदार्पणाची कॅप मिळाल्यानंतर नौशाद खान यांनी रोहित शर्मासोबतही संवाद साधला. एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये नौशाद खान रोहितला म्हणाले की, ' ' सर लक्ष्य ठेवा त्याच्यावर..' यावर उत्तर देत रोहित शर्मा म्हणाला की, ' होय नक्कीच..आम्हाला चांगलंच माहीत आहे तुम्ही त्याच्यावर किती मेहनत घेतली आहे.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नंदुरबार बाजार समितीत टोमॅटोची आवक घटल्याने भाव दुप्पट

Akola : पाण्यात पडलेल्या बकरीला वाचविले पण जीव गमावला; नदीतील डबक्यात बुडून एकाचा मृत्यू

Vasai - Virar MSRTC : कर्मचाऱ्यांना पगार नाही, वसई-विरार मनपाची बससेवा ठप्प; ऐन गणेशोत्सवात नागरिकांना मनस्ताप

Ladki Bahin Yojana: लाडकींमुळे आमदारांचा निधी रखडला? ९ महिन्यांपासून १ रुपयाही मिळाला नाही; मंत्रालयात हेलपाटे

DA Hike: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! महागाई भत्त्यात वाढ; १७०० कोटी मंजूर

SCROLL FOR NEXT