ind vs eng 5th test sarfaraz khan hits sachin tendulkar style shot video went viral  twitter
Sports

Sarfaraz Khan Shot: सरफराजचा मास्टर-ब्लास्टर स्टाईल बैठक शॉट! डोळ्याचे पारणे फेडणाऱ्या शॉटचा Video एकदा पाहाच

India vs England 5th Test: इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या पाचव्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवशी भारतीय फलंदाजांचा बोलबाला पाहायला मिळाला आहे.

Ankush Dhavre

Sarfaraz Khan Shot Video:

इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या पाचव्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवशी भारतीय फलंदाजांचा बोलबाला पाहायला मिळाला आहे. फलंदाजी सर्वांनी बहुमूल्य योगदान दिलं. मात्र यशस्वी जयस्वाल आणि सरफराज खानने केलेली खेळी खास ठरली. जयस्वालने ९८.२८ च्या स्ट्राइक रेटने ५७ धावा केल्या. तर दुसरीकडे सरफराज खानने ९३.३३ च्या सरासरीने ५६ धावा कुटल्या. यादरम्यान त्याने ८ चौकार आणि १ षटकार मारला. यादरम्यान त्याने एक सचिन तेंडुलकर स्टाईल बैठक शॉट मारला, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

सरफराज खान हा आपल्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो. त्याने या डावात मार्क वुडला टार्गेट केलं. आपल्या अर्धशतकी खेळीदरम्यान त्याने एकापेक्षा एक शॉट खेळले. दरम्यान लक्ष वेधलं ते बैठक शॉटने. त्याच्या या हटके शॉटचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

पडिक्कलसोबत मिळून महत्वपूर्ण भागीदारी..

या सामन्यातील पहिल्या डावात रोहित शर्मा आणि शुभमन गिल या दोघांनी मिळून शतकी खेळी केली. दरम्यान हे दोघे बाद झाल्यानंतर देवदत्त पडिक्कल आणि सरफराज खानने मिळून संघासाठी महत्वपूर्ण खेळी केली. दोघांनी मिळून संघासाठी बहुमूल्य धावा जोडल्या.

भारतीय संघाने घेतली मोठी आघाडी..

इंग्लंडने केलेल्या २१८ धावांच्या प्रत्युत्तरात भारतीय संघाने दमदार सुरुवात केली. भारतीय संघाकडून रोहित शर्माने १०३ धावांची खेळी केली. तर शुभमन गिलने ११० धावा केल्या. यासह देवदत्त पडिक्कल, सरफराज खान आणि यशस्वी जयस्वाल यांनी अर्धशतकी खेळी करत भारतीय संघाची धावसंख्या ४०० पार पोहचवली. दुसऱ्या दिवसाखेर भारतीय संघाने २५५ धावांची आघाडी घेतली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MHT-CET Exam 2027 : विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! MHT CET ची परीक्षा कधी होणार? सीईटी सेलची महत्त्वाची माहिती

Maharashtra News Live Update: २२ किलोमीटरच्या रस्त्यासाठीगडचिरोलीत हजारो आदिवासींचा एल्गार

Carpet Cleaning : घाणेरडे कार्पेट स्वच्छ करण्यासाठी एकही रुपया खर्च नको! घरच्या घरी ड्राय क्लीनिंग करण्याच्या 3 सोप्या स्टेप्स

AC temperature: कोणत्या तापमानावर एसी चालवल्याने विजेचे बिल कमी होतं?

Akshay Kumar : टायगर श्रॉफवरील हल्ल्याचा अक्षय कुमारने घेतला धसका? घराबाहेर वाढवली सुरक्षा

SCROLL FOR NEXT