Ind Vs Eng mohammad siraj confronts joe root X
Sports

Ind Vs Eng : लॉर्ड्सच्या मैदानात मोठा राडा, इंग्लंडच्या जो रूटला DSP सिराज भिडला; पाहा Viral Video

India Vs England 3rd Test : लॉर्ड्स स्टेडियमवर भारत विरुद्ध इंग्लंड तिसरा कसोटी सामना रंगला आहे. या सामन्यादरम्यानचा मोहम्मद सिराज आणि जो रुट यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Yash Shirke

Ind Vs Eng 3rd Test : भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेतील तिसरा सामना सध्या लॉर्ड्सच्या मैदानात सुरु आहे. इंग्लंडने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. डावाच्या सुरुवातीला इंग्लंडला दोन मोठे धक्के बसले. त्यानंतर जो रूट आणि ओली पोप यांनी खेळ पुढे नेला. सामन्याच्या दुसऱ्या डावात भारताचा मोहम्मद सिराज आणि इंग्लंडचा जो रूट यांच्यामध्ये गरमागरमी झाल्याचे पाहायला मिळाले.

तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवसाच्या दुसऱ्या डावात ३१ व्या ओव्हरमध्ये मोहम्मद सिराज गोलंदाजी करण्यासाठी आला. त्याने सहाही चेंडू उत्कृष्टरित्या फेकले. त्यावेळेस जो रूट स्ट्राईकवर होता. स्टंपवर येणारे सर्व चेंडू जो रूटने खेळून काढले. ओव्हरच्या दुसऱ्या चेंडूदरम्यान मोहम्मद सिराज जो रूटकडे गेला आणि त्यानने रूटला काहीतरी म्हटले. रूटने यावर काहीच प्रतिक्रिया दिली नाही. ते दोघे एकमेकांकडे पाहत होते. या घटनेदरम्यानचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

बेन स्टोक्सने तिसऱ्या कसोटी सामन्यामध्येही टॉस जिंकला. पण यावेळेस त्याने प्रथम फलंदाजी करण्याचे ठरवले. त्यानुसार, जॅक क्रॉली आणि बेन डकेट ही इंग्लंडची सलामी जोडी मैदानात उतरली. तेराव्या ओव्हरमध्ये नितीशकुमार रेड्डीने जॅक क्रॉली (१८ धावा) आणि बेन डकेट (२३ धावा) या दोघांनाही बाद केले. त्यानंतर जो रूट आणि ओली पोप यांनी इंग्लंडचा डाव पुढे नेला. तिसऱ्या सत्राच्या सुरुवातीला ओली पोप ४४ धावांवर बाद झाला.

लीड्सचा कसोटी सामना इंग्लंडने जिंकला. त्यानंतर एजबॅस्टन स्टेडियमवर विजय मिळवत भारतीय संघाने इतिहास रचला. मालिकेमध्ये दोन्ही संघाने १-१ अशी बरोबरी केली आहे. आता मालिकेमध्ये आघाडी घेण्यासाठी भारत आणि इंग्लंड हे दोन्ही संघ आतुर झाले आहेत. तिसरा सामना जिंकून कसोटी मालिकेमध्ये कोण पुढे जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT