Jasprit Bumrah India Vs England Lords Test Cricinfo
Sports

Jasprit Bumrah : लॉर्ड्सवर जसप्रीत बुमराहचा जलवा, शतकवीर रूटसह कॅप्टन स्टोक्सही चक्रावला; इंग्लंडच्या अडचणी वाढल्या

Ind Vs Eng 3rd Test : सध्या लंडनमधील लॉर्ड्स स्टेडियमवर भारत विरुद्ध इंग्लंड तिसरा कसोटी सामना रंगला आहे. या सामन्याच्या दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात जसप्रीत बुमराहने लागोपाठ ३ विकेट्स घेतल्या आहेत.

Yash Shirke

Ind Vs Eng : लॉर्ड्स क्रिकेट स्टेडियमवर भारत विरुद्ध इंग्लंड तिसऱ्या कसोटी सामन्यातील दुसरा दिवस सुरु आहे. या सामन्यामध्ये जसप्रीत बुमराहने कहर केला आहे. दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रामध्ये बुमराहने लागोपाठ तीन विकेट्स घेतल्या आहेत. आता भारतीय गोलंदाज इंग्लंडच्या फलंदाजांवर वरचढ ठरत असल्याचे पाहायला मिळत आहे.

भारत-इंग्लंड तिसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी जसप्रीत बुमराहने हॅरी ब्रूकला बाद केले होते. दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रामध्ये ८५ व्या ओव्हरमध्ये बुमराहने ४४ धावांवर इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सला बाद केले. त्यानंतर ८७ व्या ओव्हरमध्ये पहिल्या चेंडूवर शतकवीर जो रुटचीही विकेट बुमराहने घेतली. त्याच ओव्हरमध्ये दुसऱ्या चेंडूवर ख्रिस वोक्सला शून्यावर बुमराहने बाद केले. पाचवी विकेट घेऊन बुमराह विक्रम करणार असल्याची आशा चाहत्यांनी वर्तवली आहे. पहिल्या लीड्स सामन्यामध्येही बुमराहने पाच विकेट्स घेतल्या होत्या.

बेन स्टोक्सने भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेतील तिसऱ्या सामन्यामध्ये टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर इंग्लंडचे दोन्ही सलामीवीर फलंदाजीसाठी मैदानात उतरले. नितीश कुमार रेड्डीने दोन्ही सलामीवीरांना माघारी पाठवले. त्यानंतर जो रुट आणि ओली पोप यांनी खेळ पुढे नेला. दुसऱ्या दिवशी जो रुटने शतक पूर्ण केले.

अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीमध्ये भारत आणि इंग्लंड दोन्ही संघ बरोबरीला आहेत. लीड्सचा कसोटी सामना इंग्लंडच्या संघाने जिंकला. त्यानंतर एजबॅस्टन कसोटी जिंकून टीम इंडियाने इतिहास रचला. आता लॉर्ड्सवरील सामना जिंकून आघाडी घेण्यासाठी दोन्ही संघ सज्ज झाले आहेत. दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रापर्यंत भारताचे पारडे जड असल्याचे पाहायला मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fig Water for Weight Loss: वजन कमी करण्यासाठी बदाम-अक्रोडऐवजी सकाळी प्या अंजीरचं पाणी; शरीराला होतील भरपूर फायदे

Maharashtra News Live Update: लातूरमध्ये मराठा आंदोलकांचं पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन सुरू

Ration Card Free Ration: रेशन कार्डधारकांसाठी खुशखबर! २५ सप्टेंबरदरम्यान साखर फक्त १८ रुपये किलो, मोफत गहू-तांदूळ मिळणार

Eknath Shinde : शिंदेसेनेला मोठा धक्का! ठाण्यातील नगरसेविका सुलेखा चव्हाण यांचे पद रद्द

Bigg Boss 20 : 'बिग बॉस २०'च्या घरात कोणाची सत्ता चालणार? 'हा' सदस्य ठरला पहिला कॅप्टन, गेममध्ये नवा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT