england google
Sports

IND vs ENG: इंग्लंडसाठी 'करो यो मरो', एक दिवसाआधीच जाहीर केली तगडी प्लेइंग ११; कोणाला मिळालं स्थान?

England Playing XI: भारत आणि इंग्लंड यांच्यात होणाऱ्या तिसऱ्या सामन्यासाठी इंग्लंडने आपली प्लेइंग ११ जाहीर केली आहे.

Saam TV News

भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ टी-२० सामन्यांची मालिका सुरु आहे. मालिकेतील सुरुवातीच्या दोन्ही सामन्यांमध्ये भारतीय खेळाडूंचा जलवा पाहायला मिळाला. भारतीय संघ या मालिकेत २-० ने आघाडीवर आहे.

मालिकेतील तिसरा सामना राजकोटच्या मैदानावर रंगणार आहे. दुसऱ्या सामन्यात इंग्लंडने दमदार खेळ केला होता. मात्र तिलक वर्माच्या आक्रमक फलंदाजीमुळे इंग्लंडला हा सामना गमवावा लागला. मालिकेतील तिसरा सामना २८ जानेवारीला रंगणार आहे. दरम्यान या सामन्याच्या एक दिवसाआधीच इंग्लंडने आपली प्लेइंग ११ जाहीर केली आहे.

तिसऱ्या टी-२० सामन्यासाठी इंग्लंडच्या प्लेइंग ११ ची घोषणा

इंग्लंडचा संघ टी-२० मालिकेत २-० ने पिछाडीवर आहे. त्यामुळे इंग्लंडला मालिकेत टिकून राहायचं असेल, हा सामना कुठल्याही परिस्थितीत जिंकावा लागेल. दरम्यान इंग्लंडने एक दिवसाआधीच प्लेइंग ११ ची घोषणा केली आहे.

या सामन्यासाठी इंग्लंडच्या प्लेइंग ११ मध्ये कुठलाही बदल करण्यात आलेला नाही. ज्या खेळाडूंना दुसऱ्या सामन्यासाठी संधी दिली गेली होती. त्याच खेळाडूंना तिसऱ्या सामन्यासाठी संधी देण्यात आली आहे. इंग्लंड क्रिकेटकडून घोषणा करताना सांगण्यात आलंय की, तिसऱ्या सामन्यासाठी प्लेइंग ११ मध्ये कुठलाही बदल करण्यात आलेला नाही.

इंग्लंडसाठी करो या मरो

इंग्लंडला पहिल्या टी-२० सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर दुसऱ्या टी-२० सामन्यात इंग्लंडच्या प्लेइंग ११ मध्ये २ बदल करण्यात आले होते. दुसऱ्या सामन्यात इंग्लंडने दमदार कमबॅक केलं होतं. त्यामुळे तिसऱ्या सामन्यासाठी इंग्लंडच्या प्लेइंग ११ मध्ये कुठलाही बदल करण्यात आलेला नाही. हा सामना जिंकून इंग्लंडचा संघ मालिकेत कमबॅक करण्याच्या प्रयत्नात असणार आहे.

मालिकेतील तिसऱ्या सामन्यासाठी अशी आहे इंग्लंडची प्लेइंग ११:

बेन डकेट, फिलिप सॉल्ट (यष्टीरक्षक), जोस बटलर (कर्णधार), हॅरी ब्रूक, लियाम लिविंगस्टन, जेमी स्मिथ, जेमी ओवरटन, ब्रायडन कार्स, जोफ्रा आर्चर, आदिल राशिद, मार्क वुड.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kidney Disease Symptoms: डोळ्यातून पाणी अन् त्वचेत बदल जाणवतोय? असू शकतात किडनी फेल्युअरची लक्षणे, वाचा संपूर्ण माहिती

Maharashtra Live News Update : दिवाळीनिमित्त पुणे मेट्रोच्या वेळापत्रकात बदल

Shocking News : आईच्या मृतदेहासोबत बंद खोलीत कोंडून घेतलं, १३ वर्ष घराबाहेर पडला नाही, नेमकं काय प्रकरण

Amravati : अमरावती जिल्ह्यात ३५ टक्के शेतकरी अतिवृष्टीच्या मदतीपासून दूरच; शासनाची हमी हवेतच

Maharashtra Politics : दिवाळीत धमाका! भाजपच्या गळाला मोठा मासा, ६ टर्म आमदार कमळ घेण्याच्या तयारीत

SCROLL FOR NEXT