team india twitter
Sports

IND vs ENG,Playing XI: भारतानं टॉस जिंकला, बॉलिंगचा निर्णय; २ प्रमुख खेळाडूंना बसवलं; पाहा प्लेइंग ११

India vs England 2nd T20I Playing XI : भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये सुरु असलेल्या टी-२० मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकला आहे.

Ankush Dhavre

भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ टी-२० सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिला सामना कोलकाताच्या ईडन गार्डन्सच्या मैदानावर पार पडला होता. या सामन्यात भरतीय संघाने शानदार विजय मिळवला होता.

यासह मालिकेत १-० ने आघाडी घेतली. दरम्यान मालिकेतील दुसरा सामना चेन्नई एमए चिंदबरम स्टेडिययमध्ये सुरु आहे. या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान या सामन्यासाठी भारतीय संघात २ मोठे बदल करण्यात आले आहेत.

भारतीय संघाने जिंकला टॉस

भारतीय संघाने मालिकेतील पहिल्या सामन्यात विजय मिळवला आहे. त्यामुळे भारतीय संघ दुसरा सामना जिंकून २-० ने आघाड घेण्याच्या प्रयत्नात असणार आहे . या सामन्यात नाणेफेक जिंकून भारतीय संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

यापूर्वी देखील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडला कमी धावांवर रोखलं आणि सामना जिंकला होता. या सामन्यातही भारतीय गोलंदाजांचा असात काहीसा प्रयत्न असणार आहे.

संघात २ मोठे बदल

या सामन्यासाठी भारतीय संघात २ मोठे बदल करण्यात आले आहेत. मोहम्मद शमीला या सामन्यातूनही बाहेर ठेवण्यात आलं आहे. तर वॉशिंग्टन सुंदर आणि ध्रुव जुरेलला प्लेइंग ११ मध्ये स्थान देण्यात आलं आहे. तर रिंकू सिंग आणि नितीश रेड्डी यांना विश्रांती देण्यात आली आहे. नितीश रेड्डी दुखापतीमुळे संपूर्ण मालिकेतून बाहेर पडला आहे. तर रिंकू सिंगद दुखापतीतून सावरु शकलेला नाही.

या सामन्यासाठी अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११:

इंग्लंड- बेन डकेट, फिलिप सॉल्ट (यष्टीरक्षक), जोस बटलर (कर्णधार), हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टोन, जेमी स्मिथ, जेमी ओव्हर्टन, ब्रायडन कार्स, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, मार्क वुड

भारत (Playing XI):

संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, ध्रुव जुरेल, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, रवि बिश्नोई, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी; भाजपमध्ये मोठा फेरबदल; अनेक नेत्यांची होणार उचलबांगडी, राजकीय उलथापालथ होण्यामागे कारण काय?

Maharashtra News Live Update: कराड शहर पोलिसांची मोठी कारवाई, 95.78 ग्रॅम एमडी ड्रग जप्त

Veen Doghatli hi Tutena: 'वीण दोघातली ही तुटेना'मध्ये मोठा ट्विस्ट! चिंगीच्या गरोदरपणाचं सत्य समोर; स्वानंदी मोडणार अंशुमनचं लग्न?

विषारी दारू प्रकरणात मृतांच्या कुटुंबांना ५ लाखांची मदत; फडणवीस सरकारची घोषणा

मुंबईत ८२ इमारती अतिधोकादायक; २७३६ रहिवाशांचे जीव धोक्यात

SCROLL FOR NEXT