shubman gill twitter
Sports

Shubman Gill Catch: शुभमन गिल जोमात, इंग्लंड कोमात! मागच्या दिशेने धावत घेतला एकच नंबर कॅच, पाहा VIDEO

IND vs ENG 2nd ODI, Shubman Gill Catch Video: भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या सामन्यात शुभमन गिलने शानदार झेल घेतलाय. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

Ankush Dhavre

कटकच्या मैदानावर भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या वनडे सामन्याचा थरार सुरु आहे. या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना, आधी अक्षर पटेलने सोपा झेल सोडला.

त्यानंतर संघाचा उपकर्णधार शुभमन गिलने सीमारेषेवर मागच्या दिशेने धावत शानदार झेल घेतला. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

शुभमन गिलने घेतला भन्नाट झेल

या सामन्यात फलंदाजी करताना इंग्लंडच्या फलंदाजांनी भागीदारी करण्यावर भर दिला. इंग्लंडला दुसरा धक्का बसल्यानंतर हॅरी ब्रुक आणि जो रुटने मिळून इंग्लंडचा डाव सांभाळला. मात्र हर्षित राणाने ही जोडी फोडून काढली.

भारतीय संघाकडून ३० वे षटक टाकण्यासाठी हर्षित राणा गोलंदाजीला आला. या षटकातील चौथा चेंडू हर्षितने स्लोवर चेंडू टाकला. या चेंडूवर ब्रुकने अंपायरच्या डोक्यावरुन मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा हा प्रयत्न फसला. कारण गिलने शानदार झेल घेतला.

हा झेल मुळीच सोपा नव्हता. कारण चेंडू उंच हवेत गेला होता आणि गिलला हा झेल मागच्या बाजूने धावत जाऊन पकडायचा होता. गिल मिड ऑफला क्षेत्ररक्षण करत होता. त्यावेळी चेंडू हवेत गेला. हा चेंडू सीमारेषेच्या दिशेने जात होता.

मात्र इतक्यात गिलने उलट्या दिशेने धावत जाऊन डाईव्ह मारत भन्नाट झेल घेतला. यासह हर्षितने रुट आणि ब्रुक यांच्यातील ६६ धावांची भागीदारी मोडून काढली. ब्रुक या डावात ५२ चेंडूंचा सामना करत ३१ धावांची खेळी करत माघारी परतला.

इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यासाठी अशी आहे भारतीय संघाची प्लेइंग ११:

रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, शुभमन गिल (उपकर्णधार), लोकेश राहुल (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, हर्षित राणा, वरूण चक्रवर्ती, मोहम्मद शमी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ओबीसींचं नुकसान झालेलं नाही, राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या अध्यक्षांचं विधान; VIDEO

Bihar Election : ऐन निवडणुकीत इंडिया आघाडीला जोरदार झटका, एका राज्यातील सत्ताधारी मित्रपक्ष फुटला

Maharashtra Politics: अजित पवारांच्या गटात बेशिस्तपणा वाढलाय; राष्ट्रवादीचा माजी आमदार भाजपात जाणार

Sunday Horoscope : तुम्ही यशाच्या अगदी जवळ जाणार; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात येणार टर्निंग पॉईंट

Maharashtra Live News Update : दगडूशेठ गणपती मंदिरावर फुलांची आकर्षक सजावट

SCROLL FOR NEXT