yashasvi jaiswal  twitter
Sports

Yashasvi Jaiswal Catch: यशस्वी जयस्वालने पकडला हुबेहूब ट्रेविस हेड सारखाच कॅच; रोहितला धक्काच बसला -VIDEO

IND vs ENG 1st ODI, Yashasvi Jaiswal Catch: भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या पहिल्या वनडे सामन्यात यशस्वी जयस्वालने शानदार झेल घेतला आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल माीडियावर तुफान व्हायरल होतोय.

Ankush Dhavre

टी-२० मालिकेच्या समाप्तीनंतर भारत आणि इंग्लंड यांच्यातील वनडे मालिकेला सुरुवात झाली आहे. ३ वनडे सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना नागपूरमध्ये सुरु आहे. या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

तर यजमान भारतीय संघ गोलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला आहे. दरम्यान हर्षित राणाच्या गोलंदाजीवर यशस्वी जयस्वालने भन्नाट झेल घेतलाय ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

पदार्पणात हर्षितचा धमाका

या सामन्याआधी भारतीय संघाला मोठा धक्का बसला. संघातील प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे संपूर्ण मालिकेतून बाहेर पडला आहे. त्यामुळे वेगवान गोलंदाज हर्षित राणाच्या वनडे पदार्पणाची दारं आपोआप उघडली.

इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत कन्कशन सब्स्टीट्यूट म्हणून मैदानात येणाऱ्या हर्षित राणाने अधिकतरित्या पदार्पण केलं आणि पहिल्याच सामन्यात इंग्लंडचं टॉप ऑर्डर फोडून काढलं. त्याने सुरुवातीच्या स्पेलमध्ये ५ षटक गोलंदाजी केली आणि ४३ धावा खर्च करत इंग्लंडच्या २ फलंदाजांना बाद केलं.

यशस्वी जयस्वालचा भन्नाट झेल

तर झाले असे की, भारतीय संघाची गोलंदाजी सुरु असताना भारताकडून १० वे षटक टाकण्यासाठी हर्षित राणा गोलंदाजीला आला होता. या षटकातील तिसऱ्या चेंडूवर डावखुऱ्या हाताच्या बेन डकेटने मिडविकेटच्या वरुन मारण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा हा प्रयत्ना फसला. कारण चेंडू बॅटची कडा घेऊन हवेत गेला.

त्यावेळी मिड विकेटला क्षेत्ररक्षण करत असलेल्या यशस्वी जयस्वालने मागच्या दिशेने धावत डाईव्ह मारत भन्नाट झेल घेतला. यासह शानदार सुरुवात मिळालेला डकेट २९ चेंडूत ३२ धावांची खेळी करत माघारी परतला. यशस्वीने टिपलेल्या या झेलने क्रिकेट फॅन्सला ट्रेविस हेडच्या झेलची आठवण करुन दिली. हेडने असाच झेल पकडून वर्ल्डकप फायनलमध्ये रोहित शर्माला बाद करत माघारी धाडले होते. यशस्वीच्या या शानदार झेलचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

विराट कोहली प्लेइंग ११ मधून बाहेर

या सामन्यासाठी भारतीय संघाच्या प्लेइंग ११ मध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. टी-२० मालिकेनंतर वर्षातील पहिल्याच वनडे सामन्यात विराट कोहलीला विश्रांती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विराट कोहलीच्या घुडघ्याला दुखापत झाली आहे. त्यामुळे तो या सामन्यात खेळताना दिसून येणार नाहीये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूच्या दरबारी राजकीय नेत्यांची हजेरी; अशोक खरातचे 40 भक्त कोण?

SCROLL FOR NEXT