virat kohli  twitter
क्रीडा

World Cup 2023: विराटला टाकलेला चेंडू अंपायरनं वाइड का दिला नाही? नियम काय सांगतो ? वाचा Explainer

Ankush Dhavre

IND vs BAN, Wide Ball Controversy: 

पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर भारत आणि बांगलादेश यांच्यातील रोमांचक सामना पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने ७ गडी राखून विजय मिळवला. मात्र भारतीय संघाच्या विजयापेक्षा सर्वाधिक चर्चा झाली ती विराट कोहलीच्या शतकाची. विराटने ९७ चेंडूंचा सामना करत १०३ धावांची तुफानी खेळी केली. (Virat Kohli Century)

हे शतक पूर्ण करण्यात केएल राहुलने मोलाचं योगदान दिलं. केएल राहुलसह अंपायर रिचर्ड केटलबरो देखील तितकाच चर्चेत राहिला.

रिचर्ड केटलबरोने वाइडचा निर्णय देणं टाळलं आणि विराटचं शतक पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा झाला, अशी सर्वत्र चर्चा सुरू आहे. मात्र खरंच रिचर्ड केटलबरोने विराटचं शतक पूर्ण व्हावं म्हणून वाइडचा निर्णय देणं टाळलं का? समजून घ्या काय सांगतो वाइड चेंडूचा नियम.

विराटच्या शतकापूर्वी काय घडलं?

तर झाले असे की, भारतीय संघाला जिंकण्यासाठी केवळ २ धावांची गरज असताना विराटला शतक पूर्ण करण्यासाठी ३ धावांची गरज होती. विराट नाबाद ९७ धावांवर फलंदाजी करत असताना गोलंदाजी करत असलेल्या नासुम अहमदने लेग साईडच्या दिशेने चेंडू टाकला.

हा चेंडू विराटने सोडून दिला. या चेंडूवर अंपायरने वाइडचा निर्णय देणं टाळळं. आयसीसीचा नियम पाहिला तर अंपायरने कोणाचाही पक्ष न घेता योग्य निर्णय दिला आहे.

काय सांगतो नियम?

गेल्या वर्षीच क्रिकेटच्या नियमांमध्ये काही महत्वाचे बदल करण्यात आले आहेत. त्यापैकीच एक म्हणजे वाइड चेंडूचा नियम. गोलंदाज रन अप घेत असताना फलंदाज ज्या ठिकाणी उभा आहे, त्याच लाईनवर गोलंदाजाने चेंडू टाकला आणि चेंडू पडल्यानंतर फलंदाजाने आपली जागा सोडली तर चेंडू वाइड द्यायचा की नाही हे पूर्णपणे अंपायरवर अवलंबून असते. (Latest sports updates)

नासुम अहमद ज्यावेळी रनअप घेत होता,त्यावेळी विराट कोहली लेग स्टम्पच्या बाहेर उभा होता. चेंडू टाकताच विराच आत आला. त्यामुळे चेंडू किपरने पकडला. जर तो ऑफ साईडला आला नसता तर चेंडू त्याच्या पॅडला जाऊन धडकला असता. त्यामुळे अंपायरने योग्य निर्णय घेतल असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rashi Bhavishya Today : श्री महालक्ष्मीची कृपा होणार, 'या' ६ राशीच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार; वाचा तुमचे राशिभविष्य

Horoscope Today : गुंतवणुकीसाठी योग्य दिवस, मोठा फायदा होण्याची शक्यता; वाचा आजचे तुमचे राशीभविष्य

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

SCROLL FOR NEXT