team india twitter
Sports

IND vs BAN Records: रेकॉर्ड ब्रेकिंग सामना! टीम इंडियाने एकाच सामन्यात मोडून काढले हे मोठे रेकॉर्ड्स

India vs Bangladesh 3rd T20I: भारत आणि बांगलादेश यांच्यातील तिसऱ्या टी-२० सामन्यात भारतीय फलंदाजांनी रेकॉर्ड्सचा पाऊस पाडला आहे.

Ankush Dhavre

India vs Bangladesh 3rd T20I, Records: भारतीय फलंदाजांनी बांगलादेशच्या गोलंदाजांवर चांगलाच हल्ला चढवला आहे. हैदराबादच्या मैदानावर सुरु असलेल्या भारत आणि बांगलादेश यांच्यातील तिसऱ्या सामन्यात पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता. मात्र पाऊस हा धावांचा पाडला गेला आहे. या सामन्यात भारतीय संघाने धावांचा पाऊस पाडत अनेक मोठे रेकॉर्ड मोडून काढले आहेत.

पावरप्लेमध्ये सर्वात मोठा स्कोअर

  • टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पावरप्लेमध्ये भारतीय संघाचा सर्वोच्च स्कोअर

  • ८२-१ विरुद्ध बांगलादेश, हैदराबाद, २०२४

  • ८२-२ विरुद्ध स्कॉटलंड, दुबई, २०२१

  • ७८-२ विरुद्ध दक्षिण आफ्रिका, जोहान्सबर्ग, २०१८

  • ७७-१ विरुद्ध ऑस्ट्रेलिया, तिरुवनंतपुरम, २०२३

  • ७७-१ विरुद्ध श्रीलंका, नागपूर, २००९

प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाने या सामन्यात धावांचा पाऊस पाडला. भारतीय संघाने पावरप्लेमध्ये बांगलादेशच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. पावरप्लेमध्ये भारतीय संघाने ८२ धावांचा आकडा गाठला. तर ७.१ षटकात १०० धावांचा आकडा गाठला. आतापर्यंत कुठल्याही संघाने इतक्या कमी चेंडूत १०० धावांचा आकडा गाठला नव्हता. त्यानंतर १०० हून १५० धावांचा आकडा कधी गाठला हे देखील कळालं नाही. संजू सॅमसनने एकाच षटकात सलग ५ षटकार खेचले.

टी-२० क्रिकेटमध्ये सुरुवातीच्या १० षटकात सर्वाधिक धावा करणारे संघ

  • १५६-३, ऑस्ट्रेलिया विरुद्ध स्कॉटलंड, २०२४

  • १५४-४, एस्टोनिया विरुद्ध साइप्रस, २०२४

  • १५२-१, भारत विरुद्ध बांगलादेश, २०२४

  • १४९-०, दक्षिण आफ्रिका विरुद्ध वेस्टइंडीज, २०२३

  • १४७-१, न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका, २०१६

टी-२० आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाच्च धावसंख्या

  • ३१४-३ धावा- नेपाळ विरुद्ध मंगोलिया - २०२३

  • २९७-६ धावा- भारत विरुद्ध बांगलादेश - २०२४

  • २७८-३ धावा- भारत विरुद्ध अफगाणिस्तान, २०१९

टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक

  • ३५ चेंडू- डेव्हिड मिलर, विरुद्ध बांगलादेश, २०१७

  • ३५ चेंडू- रोहित शर्मा, विरुद्ध श्रीलंका, २०१७

  • ३९ चेंडू- जॉनसन चार्ल्स, विरुद्ध श्रीलंका, २०२३

  • ४० चेंडू, संजू सॅमसन, विरुद्ध बांगलादेश, २०२४

  • ४२ चेंडू, हजरतुल्लाह जजई, विरुद्ध आयर्लंड, २०१९

  • ४२ चेंडू, लियाम लिविंगस्टन, विरुद्ध पाकिस्तान, २०२१

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saturday Horoscope : गोड स्वभावामुळे इतरांना आपलेसे करून घ्याल; मेहनतीनं यश मिळवाल, 'या' ५ राशींच्या लोकांचा दिवस ठरणार खास

Maharashtra Live News Update: उत्तर प्रदेश सरकारच्या कृत्याविरोधात मालेगावात पडसाद

Power Block : मध्य रेल्वेवर सर्वात मोठा ८० दिवसांचा पॉवर ब्लॉक! असं असेल ट्रेनचं वेळापत्रक? वाचा

Laxman Hake : लक्ष्मण हाके ओबीसी चळवळीतून बाहेर पडणार? सोशल मीडियावर केली भावनिक पोस्ट

Swapna Shastra: स्वप्नात 'या' गोष्टीचं सेवन करताना दिसतंय? तर ठरतं शुभ संकेत

SCROLL FOR NEXT