MS Dhoni Run-out Saam TV
क्रीडा

MS Dhoni च्या 'त्या' रन आऊटने अवघा बांगलादेश रडला होता; पाहा Video

ICC T20 विश्वचषकाच्या सुपर-10 सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना अवघ्या 146 धावा केल्या होत्या.

वृत्तसंस्था

एमएस धोनीने आपल्या कारकिर्दीत अनेक रोमांचक विजय मिळवले आहेत. असाच एक विजय आजपासून बरोबर सहा वर्षापुर्वी भारताने बंगलादेशविरुद्ध मिळवला होता. हा सामना टी-२० विश्वचषकात झाला होता. हा सामना भारताने (Team India) एका रनाने जिंकला होता. ३ चेंडूत बंगालादेशला २ धावांची गरज होती आणि हातात चार विकेट होत्या. तरीही बांगलादेशला हा सामना गमवावा लागला होता. धोनीने शेवटच्या चेंडूवरती मुस्तिफिजुर रहमान आपल्या अंदाजात रन आऊट (MS Dhoni Run-out) केले आणि बंगालादेशाने जवळजवळ जिंकलेला सामना आपल्या पारड्यात खेचून आणला.

ICC T20 विश्वचषकाच्या सुपर-10 सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना अवघ्या 146 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात बांगलादेशला शेवटच्या षटकात 11 धावांची गरज होती. हार्दिक पांड्याच्या पहिल्या ३ चेंडूत ९ धावा झाल्या. मात्र असे असतानाही धोनीच्या कर्णधारपदाच्या जोरावर भारताने सामना जिंकला.

बांगलादेशी खेळाडू चिडवत होते

हार्दिक पांड्याने सांगितले की, जेव्हा तो शेवटची षटक टाकत होता, तेव्हा मुशफिकुर रहीम तीन चेंडूंनंतर त्याच्यासमोर विजय साजरा करत होता पण जेव्हा सामना फिरला आणि भारत जिंकला तेव्हा या भारतीय अष्टपैलू खेळाडूने बांगलादेशी डगआउटमध्ये जाऊन त्याला छेडले. भारताच्या विजयानंतर विराट कोहलीही आक्रमकपणे सेलिब्रेशन करताना दिसला होता.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs SA: पैसा वसूल मॅच! संजू - तिलकची शतकं; भारताने उभारला रेकॉर्ड ब्रेकिंग स्कोअर

Assembly Election: भुसा पाडायला आलोय, दादा भुसेंवर टीकास्त्र; शिंदे सेनेच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली !

Sanju Samson Six: खूप जोरात लागला..संजूच्या षटकारामुळे महिला फॅनला रडू कोसळलं - VIDEO

IND vs SA: संजू सॅमसनने खेचला 1500 वा षटकार! टीम इंडियाच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद

Assembly Election: बटेंगे तो कटेंगेला भाजपातूनच विरोध; पंकजा मुंडेंनंतर अशोक चव्हाणांचाही विरोध

SCROLL FOR NEXT