suryakumar yadav twitter
Sports

IND vs BAN 3rd T20I: टीम इंडियाने प्लेइंग ११ मध्ये १ बदल केला, पण Harshit Rana ला बसवलंं; BCCI ने कारणही सांगितलं

Team India Playing XI: भारत आणि बांगलादेश यांच्यातील तिसऱ्या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

Ankush Dhavre

India vs Bangladesh 3rd T20I, Team India Playing XI: हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर भारत आणि बांगलादेश यांच्यातील ३ टी-२० सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना सुरु आहे. भारतीय संघाने मालिकेतील सुरुवातीच्या दोन्ही सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर मालिकेतील तिसऱ्या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

मालिकेतील सुरुवातीच्या दोन्ही सामन्यांमध्ये भारतीय संघाने शानदार खेळ करुन दाखवला आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने फलंदाजी करताना विजय मिळवला. तर मालिकेतील दुसऱ्या सामन्यात धावांचा बचाव करताना बाजी मारली होती. आता तिसऱ्या सामन्यातही भारतीय संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उततरणार आहे.

भारतीय संघाच्या प्लेइंग ११ मध्ये १ बदल

बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यासाठी भारतीय संघात १ मोठा बदल करण्यात आला आहे. संघातील प्रमुख गोलंदाज अर्शदीप सिंगला विश्रांती देण्यात आली आहे. त्याच्या जागी फिरकी गोलंदाजी रवी बिश्नोईचा प्लेइंग ११ मध्ये समावेश करण्यात आला आहे.

मालिकेतील पहिल्या सामन्यात मयांक यादव आणि नितीश कुमार रेड्डीला पदार्पणाची संधी दिली गेली होती. मात्र हर्षित राणाला अजूनही प्लेइंग ११ मध्ये स्थान देण्यात आलेलं नाही. तिसऱ्या सामन्यात त्याला प्लेइंग ११ मध्ये स्थान मिळू शकते, अशी चर्चा सुरु होती. मात्र असं काहीच झालेलं नाही.

हर्षित राणाला संधी का दिली नाही ?

हर्षित राणाला तिसऱ्या सामन्यात पदार्पण करण्याची संधी दिली जाणार होती. मात्र त्याला ताप असल्यामुळे तो या सामन्यासाठी उपलब्ध राहू शकणार नाही. त्यामुळे तो हॉटेलमध्येच आहे, असं बीसीसीआयने सांगितलं आहे.

या सामन्यासाठी अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११:

बांगलादेश: परवेज हुसेन इमन, लिटन दास (यष्टीरक्षक), नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), तन्झिद हसन, तौहीद हृदॉय, महमदुल्ला, महेदी हसन, तस्कीन अहमद, रिशाद हुसेन, मुस्तफिजुर रहमान, तन्जीम हसन साकिब.

भारत: संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), नितीश रेड्डी, हार्दिक पंड्या, रियान पराग, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, मयांक यादव.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : मनसैनिक आणि शिवसैनिक एकत्र येण्यासाठी इच्छुक आहेत - भुजबळ

Raj Thackeray And Uddhav Thackeray: राज आणि उद्धव ठाकरे यांचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो

Maharashtra Marathi Bhasha: ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याचा जल्लोष मुंबई लोकलमध्येही|VIDEO

Raj-Uddhav Thackeray: राज-उद्धव ठाकरे याआधी एकाच मंचावर कधी आणि कुठे आले होते?

Sushil Kedia: राज ठाकरेंना धमकी देणं पडलं महागात, उद्योजक सुशील केडियांचं ऑफिस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT