team india twitter
क्रीडा

IND vs BAN 3rd T20: टीम इंडियाने विजयाचं सोनं लुटलं! रेकॉर्ड ब्रेकिंग विजयासह बांगलादेशचा सुपडा साफ

India vs Bangladesh: भारतीय संघाने बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात सामन्यात शानदार विजय मिळवला आहे.

Ankush Dhavre

India vs Bangladesh 3rd T20I: हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर भारत आणि बांगलादेश यांच्यातील ३ टी-२० सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना पार पडला. युवा खेळाडूंची भरमार असलेल्या भारतीय संघने बांगलादेशचा सुपडा साफ केला.

यापूर्वी झालेल्या कसोटी मालिकेतही भारतीय संघाने बांगलादेशला २-० ने धूळ चारली होती. आता भारतीय संघाने तिसऱ्या सामन्यात बांगलादेशसमोर जिंकण्यासाठी २९८ धावांचं आव्हान ठेवलं होतं. या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशला १६४ धावा करता आल्या. यासह भारतीय संघाने हा सामना १३३ धावांनी आपल्या नावावर केला आहे.

भारताने उभारला २९७ धावांचा डोंगर

या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघाकडून प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाकडून सलामीला आलेल्या संजू सॅमसनने ४७ चेंडूंचा सामना करत १११ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने ४७ चेंडूचा सामना करत १११ धावांची खेळी केली.

या खेळीदरम्यान ११ चौकार आणि ८ षटकार खेचले. त्यानंतर सूर्यकुमार यादवने ३५ चेंडूंचा सामना करत ७५ धावा चोपल्या. या खेळीदरम्यान त्याने ५ षटकार आणि ८ चौकार खेचले. या दोघांनी मिळून बांगलादेशच्या गोलंदाजांना धू धू धुतलं. शेवटी रियान परागने १३ चेंडूत ३४ धावा चोपल्या. तर हार्दिक पंड्याने १८ चेंडूत ४७ धावा करत भारतीय संघाची धावसंख्या ६ गडी बाद २९७ धावांवर पोहोचवली.

बांगलादेशला हा सामना जिंकण्यासाठी २९८ धावांची गरज होती. भारतीय गोलंदाजी आक्रमण पाहता, बांगलादेशसाठी हे आव्हान कठीण नव्हे, तर अशक्य होतं. फलंदाजीत दमदार कामगिरी केल्यानंतर गोलंदाजीतही भारतीय संघाचा बोलबाला पाहायला मिळाला. बांगलादेशकडून फलंदाजी करताना लिटन दासने सर्वाधिक ४२ धावांची खेळी केली. तर हृदोयने अर्धशतकी खेळी केली. मात्र त्याची ही खेळी बांगलादेशला विजय मिळवून देऊ शकली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baramati : बारामतीच्या शेवटच्या सभेत शरद पवारांचा बोलबाला; काका-पुतण्याच्या लढाईत बारामतीकर कुणासोबत? पाहा स्पेशल रिपोर्ट

Amravati : भाजप आमदाराच्या बहिणीवर जीवघेणा हल्ला; राजकीय वर्तुळात खळबळ

Nashik: नाशिकमध्ये पुन्हा एकदा राडा; भाजप आणि शरद पवार गटात तुंबळ हाणामारी| Video

Maharashtra News Live Updates: मुंबईतून रोकड जप्त होण्याचं सत्र सुरूच, एक्स्प्रेसमधून ४२ लाखांची रोकड जप्त

Jharkhand Election: झारखंड विधानसभा प्रचार सभांच्या तोफा थंडावल्या; मुख्यमंत्र्यांची प्रतिष्ठपणाला

SCROLL FOR NEXT