India vs Bangladesh 3rd T20I, Sanju Samson: भारत आणिा बांगलादेश यांच्यातील ३ टी-२० सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सुरु आहे. या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान सलामीला फलंदाजीसाठी आलेल्या संजू सॅमसनची विस्फोटक फलंदाजी पाहायला मिळाली आहे.
यशस्वी जयस्वालच्या अनुपस्थितीत संजू सॅमसनला सलामीला फलंदाजी करण्याची संधी देण्यात आली आहे. या मालिकेतील सुरुवातीच्या दोन्ही सामन्यांमध्ये त्याला चांगली सुरुवात मिळाली, मात्र या सुरुवातीचं रुपांतर तो मोठ्या खेळीत करु शकला नाही. त्यामुळे त्याच्यावरील दबाव वाढत चालला होता. मात्र मालिकेतील तिसऱ्या सामन्यात त्याने बांगलादेशच्या गोलंदाजांवर चांगलाच हल्लाबोल केल्याचे पाहायला मिळाले आहे.
तर झाले असे की, भारतीय संघाकडून अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसनची जोडी मैदानावर आली. दरम्यान दहाव्या षटकात संजूने तस्कीन अहमदवर हल्ला चढवला. या षटकातील पहिला चेंडू निर्धाव राहिला. त्यानंतर पुढील पाचही चेंडू त्याने सीमारेषेपार पोहचवले. या षटकात त्याने ३० धावा कुटल्या. संजू सॅमसनने सलग ६ षटकार मारल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.
या सामन्यासाठी अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११:
बांगलादेश: परवेज हुसेन इमन, लिटन दास (यष्टीरक्षक), नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), तन्झिद हसन, तौहीद हृदॉय, महमदुल्ला, महेदी हसन, तस्कीन अहमद, रिशाद हुसेन, मुस्तफिजुर रहमान, तन्जीम हसन साकिब.
भारत: संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), नितीश रेड्डी, हार्दिक पंड्या, रियान पराग, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, मयांक यादव.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.