ind vs aus wtc final scorecard Saam TV
क्रीडा

WTC Final 2023: रोहित-पुजाराची दमदार फलंदाजी; पण ऑस्ट्रेलियाने ६ चेंडूतच सामना फिरवला, टीम इंडिया बॅकफूटवर

Satish Daud

IND vs AUS WTC Final: आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचा अंतिम सामना अत्यंत रोमांचक स्थितीत पोहचला आहे. ऑस्ट्रेलियाने भारताला विजयासाठी तब्बल ४४४ धावांचं आव्हान दिलं आहे. या आव्हानाचा पाठलाग करताना टीम इंडियाने चौथ्या दिवशी अखेर ३ बाद १६४ धावा बनवल्या आहेत. विजयासाठी अजूनही भारताला २८० धावांची आवश्यकता आहे. (Latest sports updates)

ऑस्ट्रेलियाने दिलेल्या ४४४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाने दमदार सुरूवात केली होती. शुभमन गिल झटपट माघारी परतल्यानंतर कर्णधार रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजारा यांनी चांगली भागीदारी रचली होती.

त्यामुळे टीम इंडिया या आव्हानाचा यशस्वी पाठलाग करेल, अशी आशा क्रिडाप्रेमींच्या मनात निर्माण झाली. चौथ्या दिवशीची खेळपट्टी फलंदाजीला मदत करत होती. त्यामुळे रोहित आणि पुजारा चांगले फटके मारत होते.

त्यामुळे आता हे दोघे भारताला मोठी धावसंख्या उभारून देतील असे वाटत होते. एकीकडे कर्णधार रोहित शर्मा ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा समाचार घेत होता. तर दुसऱ्या बाजूने  चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) खेळपट्टीवर पाय रोवून उभा होता.

त्याचवेळी ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी ६ चेंडू असे टाकले की, टीम इंडिया पूर्णपणे बॅकफूटवर गेली. रोहित चांगल्या लयीत होता. पण त्याने पुन्हा एक मोठी चूक केली. नॅथन लायनला स्वीप मारण्याच्या नादात त्याने आपली विकेट गमावली.

टायमिंग चुकल्याने रोहितला स्वीप मारता आला नाही. त्यामुळे चेंडू थेट त्याच्या पायावर आदळला. बॅटचा कुठलाही संपर्क न आल्याने पंचांनी त्याला बाद ठरवले. रोहित बाद झाला आणि पुजारा आता संघाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेईल असे वाटत होते. पण, पुजाराने सुद्धा आपली विकेट फेकली.

२१ व्या षटकातील चौथ्या चेंडूवर पुजारा मोठा फटका मारण्यासाठी गेला. अप्पर कट मारत असताना पुजाराचा अंदाज चुकला आणि तो बाद झाला. त्यामुळे या सहा चेंडूंमध्ये भारताने रोहित आणि पुजारासारखे सेट झालेले फलंदाज गमावले. चौथ्या दिवशीच्या खेळात हे ६ चेंडू ऑस्ट्रेलियासाठी गेमचेंजर आणि भारतासाठी घातक ठरले.

१ बाद ९३ अशा मजबूत स्थितीत दिसणारी टीम इंडिया ३ बाद ९३ अशा संकटात सापडली. त्यानंतर फलंजीसाठी मैदानात उतरलेल्या विराट कोहलीने अजिंक्य रहाणेच्या साथीने संघाचा डाव सावरला. दोघांनी मिळून सावध फलंदाजी करत टीम इंडियाचा स्कोअर १५० च्या पार नेला. चौथ्या दिवशीचा खेळ संपला तेव्हा विराट कोहली ४४ आणि अजिंक्य रहाणे २० धावा करून नाबाद होते.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: संजय राऊतांनी सांभाळून बोलावं : बच्चू कडू

Explainer : लोकसभा ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या एकाचवेळी निवडणुका शक्य आहेत का? 'वन नेशन, वन इलेक्शन'चा फायदा नक्की कोणाला? वाचा सविस्तर

Konkan : कोकणातील 'बटरफ्लाय बीच'चा नजारा इतका भारी की गोवाही विसराल

Maharashtra Politics : अजित पवारांची सावध भूमिका, १० टक्के मुस्लिम उमेदवार मैदानात उतरवणार?

Dharangaon News : पोहण्यासाठी विहिरीत उडी मारली पण बाहेर आलाच नाही; तरुणाचा बुडून मृत्यू

SCROLL FOR NEXT