india vs australia final  twitter
Sports

IND U-19 vs AUS U-19: भारत- ऑस्ट्रेलियात रंगणार U-19 WC च्या फायनलचा थरार! असा राहिलाय दोन्ही संघांचा रेकॉर्ड

India U-19 vs Australia U-19 Record In Finals: ठरलं,तर भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये आयसीसी अंडर १९ वर्ल्डकप २०२४ स्पर्धेतील फायनलचा सामना रंगणार आहे.

Ankush Dhavre

ICC Under 19 World Cup 2024 Final:

ठरलं,तर भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये आयसीसी अंडर १९ वर्ल्डकप २०२४ स्पर्धेतील फायनलचा सामना रंगणार आहे. सेमीफायनलच्या दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानवर २ गडी राखून विजय मिळवला.

तर भारतीय संघाने सेमीफायनलच्या पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत फायनलमध्ये प्रवेश केला. आता हे दोन्ही संघ वर्ल्डकपची ट्रॉफी जिंकण्यासाठी आमने सामने येणार आहेत. दरम्यान कसा राहिलाय दोन्ही संघांचा रेकॉर्ड?जाणून घ्या.

भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांनी आयसीसी अंडर १९ वर्ल्डकप २०२४ स्पर्धेत दमदार खेळ केला आहे. दोन्ही संघांनी एकही सामना न गमावता स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. हे दोन्ही संघ तिसऱ्यांदा फायनलचा सामना खेळण्यासाठी आमने सामने येणार आहेत. यापूर्वी झालेल्या दोन्ही सामन्यांमध्ये भारतीय संघाचा दबदबा पाहायला मिळाला आहे. या दोन्ही सामन्यांमध्ये भारतीय संघाने विजय मिळवला आहे. (Cricket news in marathi)

उन्मुक्त चंदच्या नेतृत्वाखाली मिळवला होता विजय..

उन्मुक्त चंदच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने २०१२ स्पर्धेतील फायनलमध्ये प्रवेश केला होता. या सामन्यात प्रथम फलंदाजी करत असलेल्या ऑस्ट्रेलियाने ५० षटकअखेर २२५ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाकडून कर्णधार उन्मुक्त चंदने शतकी खेळी करत भारतीय संघाला विजय मिळवून दिला होता. त्याने ७ चौकार आणि ६ गगनचुंबी षटकार मारत १११ धावांची खेळी केली होती.

पृथ्वी शॉ च्या नेतृत्वाखाली मिळवला विजय...

पृथ्वी शॉ च्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने २०१८ मध्ये झालेल्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाला पराभूत करत जेतेपदावर नाव कोरलं होतं. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने २१६ धावा केल्या होत्या.

या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघातील सलामीवीर फलंदाजाने शतक झळकावलं होतं. सलामीवीर मनोज कारलाच्या शतकी खेळीच्या बळावर भारतीय संघाने या सामन्यात ८ गडी राखून विजय मिळवला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दर्शन, पार्किंग, हॉटेल… सगळ्याच्या नावाखाली शिर्डीमध्ये फसवणूक, दलालांवर अखेर प्रशासनाचा मोठा दणका

Maharashtra Live News Update: शरद पवार आणि सुनेत्रा पवार यांची होणार भेट

Mumbai-Ahmedabad Bullet Train : मुंबई–अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाला गती; पालघरमधील ४५४ मीटर लांबीच्या टनेलचे काम पूर्ण

Smriti-Palash: स्मृती-पलाशचं लग्न का मोडलं? लग्नसोहळ्यासाठी सांगलीला गेलेल्या अभिनेत्यानं सांगितली 'त्या' रात्री काय घडलं?

Todays Gold Rate : सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण, प्रति तोळा इतक्या रूपयांवर आले, पाहा मुंबई-पुण्यातील ताजे दर

SCROLL FOR NEXT