T20 match series Saam Tv Yandex
Sports

IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी टीम इंडियाच्या संघाची घोषणा; 'या' खेळाडूवर कर्णधारपदाची जबाबदारी

T20 match series : २३ नोव्हेंबरपासून ऑस्ट्रेलिया आणि भारताच्या संघामध्ये टी-२० च्या ५ सामन्यांची मालिका होणार आहे.

Bharat Jadhav

T20 match Series IND vs AUS :

वर्ल्डकपनंतर टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियाचे संघ टी२० सामनांमध्ये आमने-सामने येणार आहेत. या सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा भारतीय क्रिकेट मंडळाकडून करण्यात आलीय. ऑस्ट्रेलिया आणि भारताच्या संघामध्ये टी-२० च्या ५ सामन्यांची मालिका होणार आहे. ही मालिका २३ नोव्हेंबरपासून सुरू होणार असून हे सामने भारतात होणार आहेत. या मालिकेसाठी बीसीसीआयनं एका नव्या खेळाडूवर कर्णधारपदाची जबाबदारी सोपवलीय. (Latest News)

विशाखापट्टणम येथे २३ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या या मालिकेसाठी सूर्यकुमार यादवला टीम इंडियाचा कर्णधार बनवण्यात आले आहे. तर श्रेयस अय्यर रायपूर आणि बेंगळुरूमधील शेवटच्या दोन T२० सामन्यांसाठी उपकर्णधार म्हणून भूमिका निभावणार आहे. दोन्ही संघात होणारी ५ सामन्यांची टी २० मालिका ३ डिसेंबरला संपणार आहे. बेंगळुरूमध्ये या मालिकेचा अंतिम सामना खेळला जाणार आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान वर्ल्डकपमध्ये खेळलेल्या अनेक खेळाडूंना विश्रांती देण्यात आलीय. विश्वचषक संघाचा भाग असलेल्या प्रसिद्ध कृष्णाचाही या संघात समावेश करण्यात आला आहे. सूर्यकुमार यादव सध्या T२० मध्ये नंबर एकचा फलंदाज आहे. सूर्यकुमार यादवने भारतासाठी आतापर्यंत ५३ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने ४६.०२ च्या सरासरीने आणि १७२.७ च्या स्ट्राईक रेटने १०६६ धावा केल्या आहेत.

असा आहे भारतीय संघ

सूर्यकुमार यादव (कर्णधार), ऋतुराज गायकवाड (उपकर्णधार), इशान किशन, यशस्वी जयस्वाल, टिळक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, शिवम दुबे, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, प्रशीद कृष्णा, आवेश खान, मुकेश कुमार.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT