team india 
Sports

IND vs AUS: BCCI चं काहीतरी चुकतंय? विराट- रोहितपेक्षा जास्त धावा करणाऱ्या फलंदाजाला ठेवलंय संघाबाहेर

Cheteshwar Pujara: बीसीसीआयने काही दिवसांपूर्वीच बॉर्डर-गावसकर ट्रॉफीसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे.

Ankush Dhavre

India vs Australia: भारतीय संघाला न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेत ३-० ने पराभवाचा सामना करावा लागला आहे. ही मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये जाण्याच्या दृष्टीने भारतीय संघासाठी अतिशय महत्वाची होती.

मात्र ही मालिका भारताने गमावली. आता फायनलमध्ये जाण्यासाठी भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियामध्ये जाऊन ४-१ ने पराभूत करावं लागेल. भारतीय संघाला कुठल्याही परिस्थितीत ऑस्ट्रेलियाला ४-१ ने पराभूत करावं लागेल.

या दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. मात्र या संघातून अशा खेळाडूला विश्रांती दिली आहे, ज्याचा रेकॉर्ड विराटपेक्षा चांगला आहे.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवडण्यात आलेल्या संघात युवा आणि अनुभवी खेळाडूंना स्थान देण्यात आलं आहे. मात्र या संघातून चेतेश्वर पुजाराला संघाबाहेर ठेवण्यात आलं आहे. गेल्या दोन्ही मालिका जिंकवून देण्यात पुजाराने महत्वाची भूमिका बजावली होती.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना पुजाराचा रेकॉर्ड हा विराट कोहली आणि रोहित शर्मापेक्षाही चांगला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका जिंकण्यासाठी पुजारासारखा अनुभवी खेळाडू संघात असणं अतिशय महत्वाचं आहे.

मात्र बीसीसीआयने त्याला संघात स्थान दिलेलं नाही. पुजाराला फ्लॉप शो मुळे संघाबाहेर करण्यात आलं होतं. मात्र त्याने काऊंटी क्रिकेट आणि रणजी क्रिकेटमध्ये दुहेरी शतक झळकावत, आपण फॉर्ममध्ये असल्याची पोचपावती दिली आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसा राहिलाय रेकॉर्ड?

गेल्यावेळी जेव्हा भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेला होता, त्यावेळी कसोटी सामना वाचवण्यासाठी त्याने वेगाने चेंडू अंगाला लागू दिले, पण विकेट टाकून माघारी गेला नव्हता. पुजारा हा वर्तमान खेळाडूंमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाज आहे. त्याच्या रेकॉर्डबद्दल बोलायचं झालं, तर त्याने २५ सामन्यांमध्ये ४९.३८ च्या सरासरीने २०७४ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने ५ शतक आणि ११ अर्धशतकं झळकावली आहेत.

विराटने किती धावा केल्या आहेत?

ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना विराटनेही कसोटी क्रिकेटमध्ये २ हजार धावा केल्या आहेत. विराटच्या नावे २०४२ धावा करण्याची नोंद आहे. त्याने या धावा ४७.४८ च्या सरासरीने केल्या आहेत. तर भारताचा कर्णधार रोहित शर्माने ७०८ धावा केल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

संसदेच्या बाहेर राममंदिरातील 'चंदा चोरी', संसद आवारात अवतरले मंदिरातले साधू

Fact Check: समोसा, जिलेबीवरही आता वॉर्निंगचा स्टॅम्प? समोसा, जिलेबी सिगारेटएवढं धोकादायक?

GEN Z आंदोलकांवर गुन्हे, CJPमध्ये संताप, आंदोलकांवर कारवाईसाठी पोलीस सरसावले, सरकारच्या समर्थनात दिल्ली पोलीस कुटुंबीयांची उडी

पोलिसांची अजब कारवाई, पाटलांचं गजब विधान, 'दगडावरील आंदोलकांच्या बोटांचे ठसे आधारला जोडणार'

भिवंडीत 4 मजली इमारत कोसळली, 10 जणांचे मारेकरी कोण?

SCROLL FOR NEXT