sunil gavaskar  saam tv
Sports

IND vs AUS: बुमराहला कॅप्टन बनवा अन् रोहितला..., BGT आधी सुनील गावसकर संतापले

Rohit Sharma, Border Gavaskar Trophy: येत्या काही दिवसात बॉर्डर-गावसकर ट्रॉफीला सुरुवात होणार आहे. दरम्यान सुनील गावसकरांनी या मालिकेबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

Ankush Dhavre

Sunil Gavaskar On Rohit Sharma: भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका रंगणार आहे. बॉर्डर- गावस्कर मालिका ही वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये जाण्यासाठी भारतीय संघासाठी अतिशय महत्वाची असणार आहे.

या मालिकेतील पहिला कसोटी सामना २२ नोव्हेंबरपासून पर्थमध्ये रंगणार आहे.या सामन्यात रोहित शर्मा खेळणार नसल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान माजी भारतीय खेळाडू सुनील गावसकरांच्या मते रोहित शर्माच्या जागी जसप्रीत बुमराहकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली गेली पाहिजे.

जियो सिनेमावर बोलताना, अभिनव मुंकंदने सांगितलंय की, रोहित शर्माची पत्ती रितीका आपल्या दुसऱ्या बाळाला जन्म देणार आहे. त्यामुळे रोहित या मालिकेतील पहिल्या आणि दुसऱ्या सामन्याला मुकण्याची शक्यता वर्तवली जात आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यानंतर बोलताना, रोहित शर्मा म्हणाला होता की, मी जाणार की नाही हे निश्चित नाही, पुढे काय होतं ते पाहू..' यावरुन स्पष्ट होतंय की, रोहित मालिकेतील पहिल्या किंवा दुसऱ्या सामन्यातून बाहेर होऊ शकतो.

काय म्हणाले सुनील गावसकर?

इंडिया टूडेसोबत बोलताना, सुनील गावसकर म्हणाले की, ' कर्णधाराने पहिला कसोटी सामना खेळायलाच हवं. जर तो दुखापतग्रस्त असता, तर वेगळी गोष्ट होती. जर एखाद्या संघाचा कर्णधार पहिल्या कसोटीत उपलब्ध नसेल, तर त्याचा उपकर्णधारावर दबाव येतो. अशी चर्चा सुरु आहे की, रोहित शर्मा पहिल्या कसोटीत उपलब्ध नसेल आणि दुसऱ्या कसोटीतही खेळण्याची शक्यता कमी आहे. आगरकरांनी त्याला आत्ताच सांगावं की, तू विश्रांती घेतोय, त्यानंतर तू जेव्हा परत येशील तेव्हा तू एक खेळाडू म्हणून खेळावं. जसप्रीत बुमराहने संघाचं नेतृत्व करावं.'

यापूर्वी देखील, जेव्हा भारतीय संघ २०२१-२२ मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेला होता, त्यावेळी पहिल्या बाळाच्या जन्मासाठी विराट पहिला कसोटी सामना खेळून मायदेशी परतला होता. मात्र हे त्याने आधीच सांगितलं होतं. त्यामुळे खेळाडूंनाही आधीच कल्पना होती. पहिल्या कसोटीनंतर विराट मायदेशी परतला. त्यावेळी उपकर्णधार अजिंक्य रहाणेने नेतृत्वाची जबाबदारी स्विकारली. या मालिकेत भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT