team india  yandex
Sports

IND vs AUS, Playing XI: सिडनी कसोटीतून रोहित शर्मा बाहेर? कोणत्या ११ खेळाडूंना मिळणार स्थान?

Team India Playing XI Prediction: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाचवा कसोटी सामना सिडनीत रंगणार आहे. दरम्यान या सामन्यासाठी कशी असेल भारतीय संघाची प्लेइंग ११? जाणून घ्या.

Ankush Dhavre

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाचवा कसोटी सिडनीच्या मैदानावर रंगणार आहे. बॉर्डर-गावसकर ट्रॉफीतील ४ कसोटी सामने खेळले गेले आहेत. या मालिकेतील पहिल्या कसोटीत भारतीय संघाने शानदार विजय मिळवला होता.

तर दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. मालिकेतील तिसरा सामना ड्रॉ राहिला, तर मालिकेतील चौथा सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला. मालिकेत ऑस्ट्रेलियाचा संघ २-१ ने आघाडीवर आहे. दरम्यान शेवटच्या सामन्यासाठी कशी असेल भारतीय संघाची प्लेइंग ११? जाणून घ्या.

सिडनी कसोटी सामना हा भारतीय संघासाठी अतिशय महत्वाचा असणार आहे. मात्र या सामन्यापूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. संघातील प्रमुख वेगवान गोलंदाज आकाश दीप दुखापतीमुळे संघातून बाहेर पडला आहे. त्याची जागा भरुन काढण्यासाठी हर्षित राणा किंवा प्रसिद्ध कृष्णाला संधी दिली जाऊ शकते.

रोहित शर्माला बाहेर बसावं लागेल?

मालिकेतील पहिला सामना पर्थच्या मैदानावर पार पडला होता. या सामन्यात रोहित शर्मा खेळू शकला नव्हता. हा सामना भारतीय संघाने जिंकला होता. त्यानंतर मालकेतील पुढील ३ सामन्यांमध्ये रोहित शर्मा खेळताना दिसून आला. या ३ पैकी २ सामने भारतीय संघाने गमावले आहेत. तर १ सामना ड्रॉ राहिला आहे. या तिन्ही सामन्यांमध्ये रोहित शर्मा पूर्णपणे फ्लॉप ठरला.

दरम्यान सिडनी कसोटीच्या १ दिवसाआधी सोशल मीडियावर वेगळीच चर्चा रंगायला सुरुवात झाली आहे. एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय, ज्यात संघातील खेळाडू सराव करण्यासाठी मैदानात उतरल्याचं दिसून येत आहे. मात्र रोहित शर्मा मैदानात सराव करताना दिसून येत नाहीये. यावरुन रोहितला शेवटच्या कसोटीतून वगळलं जाऊ शकतं, अशी चर्चा सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Face Care: टॅनिंग कमी करुन 3 दिवसात मिळवा ग्लोईंग फेस, वापरा 'हा' होममेड स्पेशल फेस मास्क

Petrol Diesel Price: पेट्रोल डिझेलच्या दरात बदल; वाचा मुंबई, पुणे ते नाशिक, नागपूरमधील भाव

Lockdown News : इराण युद्धामुळे भारतात लॉकडाऊन लागणार? व्हॉट्सॲपवरील 'तो' मेसेज किती खरा? वाचा

Maharashtra Live News Update: भोंदू अशोक खरातला १४ दिवसांची न्यायलयीन कोठडी

Ashok Kharat Case: मासा पाण्यातील वनस्पती! शाकाहारी लोकांना खायायला लावले मासे, खरातचा बंडलपणा आला समोर

SCROLL FOR NEXT