सिडनीच्या मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्याचा थरार सुरु आहे. या सामन्यासाठी भारतीय संघाच्या प्लेइंग ११ मध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. कर्णधार रोहित शर्माला बसवण्यात आलं आहे.
त्याच्या जागी संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी जसप्रीत बुमराहकडे सोपवण्यात आली आहे. या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय पुन्हा एकदा फसल्याचे पाहायला मिळाले आहे.
भारतीय संघाला हवी तशी सुरुवात करता आलेली नाही. दरम्यान विराट कोहलीलाही चांगली सुरुवात मिळाली होती. मात्र त्याला मोठी खेळी करता आलेली नाही.
रोहित शर्माच्या अनुपस्थितीत केएल राहुल आणि यशस्वी जयस्वाल ही जोडी डावाची सुरुवात करण्यासाठी मैदानात आली. केएल राहुल अवघ्या ४ धावा करत माघारी परतला. त्यानंतर यशस्वी जयस्वालनेही १० धावा करत पॅव्हेलियनची वाट धरली.
भारताला ११ धावांवर पहिला धक्का बसला. तर १७ धावांवर दुसरा मोठा धक्का बसला. त्यानंतर विराट कोहली आणि शुभमन गिलने डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. मात्र गिल फार काळ खेळपट्टीवर टिकू शकला नाही. तो २० धावा करत माघारी परतला.
nana patekar trends after virat kohli dismissal विराट कोहलीला या डावात चांगली सुरुवात मिळाली होती. आधी गिलसोबत आणि मग रिषभ पंतसोबत त्याने भागीदारी केली होती. या डावात त्याने ६९ चेंडू खेळून काढले.
यादरम्यान त्याने १७ धावा केल्या. इतक्यात स्कॉट बोलँडने ऑफ साईडच्या बाहेर टाकलेल्या चेंडूवर विराट कोहली बाद होऊन माघारी परतला. विराटने बाहेर जाणारे सर्वच चेंडू सोडून दिले. मात्र एक चेंडू बॅटला लागला आणि त्यावर तो झेलबाद होऊन माघारी परतला.
विराट कोहलीची पर्थ कसोटीतील शतकी खेळी सोडली, तर उर्वरीत कुठल्याही डावात त्याला मोठी खेळी करता आलेली नाही. त्याच्या या मालिकेती ल कामगिरीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने आतापर्यंत ५, १००,७, ११, ३, ३६, ५ व १७ अशा धावा केल्या आहेत.
विराट पुन्हा एकदा स्वस्तात माघारी परतल्यानंतर, नाना पाटेकर ट्रेन्डींगला आहेत. या सामन्यापूर्वी नाना पाटेकर म्हणाले होते की, विराट माझा आवडता खेळाडू आहे. मात्र तो जेव्हा लवकर बाद होतो, तेव्हा मला जेवण घशाखाली जात नाही.' या वक्तव्यामुळे ते तुफान चर्चेत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.