kl rahul twitter
Sports

IND vs AUS: बॉक्सिंग डे कसोटीत KL Rahul रचणार इतिहास! स्पेशल हॅट्रिक करण्याची संधी

KL Rahul Record News: भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये होणाऱ्या चौथ्या कसोटी सामन्यात केएल राहुलला एक खास रेकॉर्ड आपल्या नावावार करण्याची संधी असणार आहे.

Ankush Dhavre

भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील चौथा कसोटी सामना मेलबर्नच्या मैदानावर रंगणार आहे. हा सामना २६ ते ३० डिसेंबरदरम्यान रंगणार आहे.

सध्या ही मालिका १-१ ने बरोबरीत आहे. मालिकेतील चौथा सामना जिंकून भारतीय संघाला मालिकेत आघाडी घेण्याची संधी असणार आहे. भारतीय संघाकडून फलंदाजी करताना केएर राहुलने संपूर्ण मालिकेत दमदार कामगिरी केली आहे. दरम्यान मेलबर्नमध्ये होणाऱ्या सामन्यातही त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे.

या मालिकेतील पहिला कसोटी सामना पर्थच्या मैदानावर रंगला होता . रोहित शर्मा या सामन्यात वैयक्तिक कारणास्तव खेळताना दिसून आला नव्हता. त्यामुळे त्याच्या जागी केएल राहुलला सलामीला येण्याची संधी मिळाली होती.

या संधीचं सोनं करत त्याने दोन्ही डावात दमदार कामगिरी केली होती. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात रोहित परतला. मात्र तो स्वत: मध्यक्रमात फलंदाजीला आला आणि केएल राहुल डावाच्या सुरुवातीला आला होता.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु असलेल्या मालिकेत सर्वाधिक चेंडू खेळण्याचा रेकॉर्ड हा केएल राहुलच्या नावे आहे. यासह या मालिकेत सर्वाधिक धावा करण्याचा रेकॉर्ड हा केएल राहुलच्या नावावर आहे. त्याची या स्पर्धेतील कामगिरी पाहिली, तर त्याने ४७.०० च्या सरासरीने २३५ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने २ अर्धशतकं झळकावली. यादरम्यान ८४ धावा ही त्याची सर्वाोत्तम खेळी आहे.

केएल राहुलकडे खास रेकॉर्ड नावावर करण्याची संधी

मेलबर्नच्या मैदानावर होणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यात केएल राहुलला एक खास रेकॉर्ड आपल्या नावावर करण्याची संधी असणार आहे. केएल राहुलकडे बॉक्सिंग डे कसोटीत शतकांची हॅट्रीक करण्याची संधी असणार आहे. २०२१ आणि २०२३ मध्ये झालेल्या बॉक्सिंग डे कसोटीत केएल राहुलने शतकी खेळी केली होती.

आता सलग तिसऱ्यांदा केएल राहुल बॉक्सिंग डे कसोटी सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. २०२१ मध्ये सेंच्युरीयनच्या मैदानावर पार पडला होता. या सामन्यात त्याने १२३ आणि २३ धावांची खेळी केली होती.

त्यानंतर दुसऱ्या बॉक्सिंग डे कसोटीत त्याने १०१ आणि ४ थावांची खेळी केली होती. आता सलग तिसऱ्या सामन्यात त्याला शतक झळकावण्याची संधी आहे. यासह तो शतकांची हॅट्रीक पूर्ण करु शकतो.

केएल राहुलने यावर्षी केलेली कामगिरी

केएल राहुलने यावर्षी खेळताना दमदार कामगिरी केली आहे. राहुलने २०१४ मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. यावर्षी त्याला कसोटी क्रिकेटमध्ये ८ सामने खेळण्याची संधी मिळाली. यादरम्यान त्याने १४ डावात ३९.०८ च्या सरासरीने ४६९ धावा केल्या आहेत. यादरम्यान ८६ धावा ही त्याची सर्वोत्तम कामगिरी राहिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT