josh hazlwood twitter
Sports

IND vs AUS: टीम इंडियाला दिलासा! संपूर्ण मालिकेत नडणारा ऑस्ट्रेलियन फलंदाज चौथ्या कसोटीतून बाहेर?

Travis Head Injury Update: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा कसोटी सामना मेलबर्नच्या मैदानावर रंगणार आहे. दरम्यान या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

Ankush Dhavre

भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील चौथा कसोटी सामना मेलबर्नच्या मैदानावर रंगणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघातील खेळाडू कसून सराव करत आहेत.

ही मालिका सध्या १-१ ने बरोबरीत असून चौथा कसोटी सामना हा दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वाचा असणार आहे. या बॉक्सिंग डे कसोटीपूर्वी ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज ट्रेविस हेड सराव करण्यासाठी मैदानात आलेला नाही. त्यामुळे हेड या कसोटीत खेळणार की नाही, अशी चर्चा रंगायला सुरुवात झाली आहे.

ब्रिस्बेन कसोटीतील पहिल्या डावात हेडने शानदार शतकी खेळी केली होती. त्यानंतर दुसऱ्या डावात तो अडचणीत असल्याचं दिसून आलं होतं. त्यामुळे पाचव्या दिवशी तो मैदानावर उतरला नव्हता.

आता चौथ्या कसोटीपूर्वी झालेल्या सराव सत्रासाठीही तो मैदानात उतरलेला नाही. सामन्यानंतर त्याला आपल्या दुखापतीबाबत प्रश्न विचारला असता, तो म्हणाला होता की, थोडीशी कणकणी आहे पण चौथ्या कसोटीपूर्वी तो पूर्णपणे फिट होईल.

सिडनी मॉर्निंग हेराल्डने दिलेल्या वृत्तानुसार, हेडला पुन्हा एकदा आपली फिटनेस सिद्ध करावी लागणार आहे. या वृत्तानुसार, ऑस्ट्रेलियाच्या हेड कोचने सांगितलं आहे की, ट्रेविस हेड बॉक्सिंग डे कसोटी खेळणार.

बॉर्डर- गावसकर मालिकेत हेडची तुफान फटकेबाजी

बॉर्डर- गावसकर ट्रॉफीत ट्रेविस हेडची बॅट चांगलीच तळपली आहे. या मालिकेत फलंदाजी करताना तो भारतीय गोलंदाजांवर चांगलाच भारी पडला आहे. आतापर्यंत मालिकेतील ३ सामन्यांम्ये त्याने दमदार फलंदाजी केली आहे. त्याने ८१.२ च्या सरासरीने ४०९ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने २ शतक आणि १ अर्धशतक झळकावलं आहे.

यादरम्यान १५२ धावा ही त्याची सर्वोत्तम खेळी राहिली आहे. हेडला विश्रांती मिळणं ही भारतीय संघासाठी समाधानकारक बाब आहे.

कारण संपूर्ण मालिकेत हेड भारतीय गोलंदाजांना नडला आहे. चौथ्या कसोटीत जर तो संघात नसेल, तर ऑस्ट्रेलियाचं मोठं नुकसान होऊ शकतं. कारण गेल्या तिन्ही सामन्यांमध्ये त्याने मध्यक्रमात फलंदाजी करताना संघाचा डाव सांभाळला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: केरळमध्ये 'मेंदू खाणारा अमिबा' घेतोय लोकांचा जीव

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती विसर्जनासाठी सजला ‘श्री गणनायक’ रथ; केरळ मंदिराची प्रतिकृती पुण्यात उजळली पाहा मनमोहक VIDEO

Stress Relief Tricks : ऑफिसमध्ये काम करताना स्ट्रेस जाणवतोय? या ट्रिक करा फॉलो

Dnyanada Ramtirthkar: अवखळ हासरी, अल्लड लाजरी दिसते चंद्राची कोर साजरी ...

Pani puri masala recipe: घरीच बनवा पाणीपुरीच्या तिखट पाण्याचा सुका मसाला; एक चमचा पाण्यात घाला की काम झालंच

SCROLL FOR NEXT