rohit sharma twitter
Sports

Rohit Sharma Retirement: तिसऱ्या कसोटीत रोहित शर्माने दिले निवृत्तीचे संकेत? बाद होताच केली ती कृती- PHOTO

Rohit Sharma Retirement News : भारताचा कर्णधार रोहित शर्माने मालिकेतील तिसऱ्या कसोटी सामन्यात अशी काही कृती केली, ज्यामुळे त्याच्या निवृत्तीची चर्चा रंगायला सुरुवात झाली आहे.

Ankush Dhavre

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु असलेल्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात रोहित खेळताना दिसून आला नव्हता. त्याने वैयक्तिक कारणास्तव माघार घेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटी सामन्यात तो मधल्या फळीत फलंदाजीला उतरला.

मात्र या दोन्ही सामन्यांमध्ये तो स्वस्तात माघारी परतला आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर येण्यापूर्वी न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या मालिकेतही त्याची बॅट शांतच राहिली होती. आता ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत फ्लॉप राहिल्यानंतर त्याने निवृत्तीचे संकेत दिले आहेत.

मालिकेतील पहिल्याच सामन्यात रोहित शर्माच्या अनुपस्थितीत केएल राहुल सलामीला फलंदाजीसाठी आला होता. या सामन्यात केएल राहुलने संघाला चांगली सुरुवात करुन दिली. त्यानंतर दुसऱ्या कसोटीत जेव्हा रोहित परतला.

त्यावेळी रोहितने केएल राहुलकडे सलामीची जबाबदारी देऊन स्वत: मधल्या फळीत खेळण्याचा निर्णय घेतला. मात्र मध्यक्रमात खेळतानाही त्याला सुर गवसलेला नाही. २ सामन्यातील तिन्ही डावात तो स्वस्तात माघारी परतला.

या सामन्यात फलंदाजी करताना, रोहित अवघ्या १० धावांवर माघारी परतला. पॅट कमिन्सने टाकलेला चेंडू रोहितच्या बॅटची कडा घेत, अॅलेक्स कॅरीच्या हातात गेला. रोहित बाद झाला, पण केएल राहुल खिंड लढवत राहिला.

रोहित बाद झाल्यानंतर जेव्हा पॅव्हेलियनच्या दिशेने जात होता, त्यावेळी त्याने ग्लोव्ह्ज काढून साईड स्क्रीनच्या मागे ठेवले. हे फोटो व्हायरल होताच, रोहितच्या निवृत्तीची चर्चा सुरु झाली आहे. रोहितने निवृत्ती घेणार असल्याचे संकेत दिले आहेत, असं म्हटलं जात आहे.

बुमराह- आकाशदीपने फॉलोऑन टाळला

या सामन्यात भारतीय संघावर फॉलोऑनचं संकट ओढावलं होतं. भारतीय संघाला फॉलोऑन टाळण्यासाठी २४६ धावा करायच्या होत्या. मात्र भारताला हवी तशी सुरुवात करता आली नव्हती. भारताकडून फलंदाजी करताना केएल राहुलने सर्वाधिक ८४ धावांची खेळी केली. तर रविंद्र जडेजाने ७७ धावा केल्या.

शेवटी फलंदाजी करताना आकाशदीप आणि जसप्रीत बुमराहने नाबाद ३९ धावांची भागीदारी करत भारतीय संघाला फॉलोऑनपासून वाचवलं आहे. भारतीय संघाने चौथ्या दिवसाखेर ९ गडी बाद २५२ धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियाकडे अजूनही १९३ धावांची आघाडी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manikrao Kokate : मोठी बातमी! मंत्री माणिकराव कोकाटेंना अटक होणार, वॉरंट निघाले

Latest Blouse Hand Designs: या 5 पॅटर्नमध्ये ब्लाऊजच्या हाताची डिझाईन शिवा, कोणतीही साडी नेसली तरी सुंदरच दिसेल

KDMC News : राज ठाकरेंना आणखी एक धक्का, शहराध्यक्षांचा मनसेला जय महाराष्ट्र

Maharashtra Live News Update: परभणीत राष्ट्रवादी अजित पवार पक्षातील दोन्ही गट स्वबळावर लढण्यासाठी ठाम

Hair Care: हजारो रुपयांच्या केराटिन ट्रीटमेंट्स कशाला? या ७ घरगुती कंडिशनरने केस बनवतील सिल्की आणि सॉफ्ट

SCROLL FOR NEXT