IND vs AUS Match Winner India VS Australia Match
क्रीडा

IND vs AUS Match Result: तिसऱ्या एकदिवशीय सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून भारताचा पराभव, २८६ धावांवर टीम इंडिया ऑल ऑउट

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

India VS Australia Match Winner:

अखेरच्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाने टीम इंडिया दारूण पराभव केला. ऑस्ट्रेलिया तिसरा सामना ६६ धावांनी जिंकला. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाच्या संघानं निर्धारित ५० षटकात ७ गडी गमावत ३५२ धावा केल्या होत्या. कांगारुनं दिलेल्या आव्हानांचा पाठलाग करताना भारतीय संघानं जोरदार फटकेबाजी फलंदाजीला सुरुवात केली. कर्णधार रोहित शर्मानं ५७ चेंडूत ८१ धावांची खेळी केली. त्यानंतर विराट कोहलीनं आपले अर्धशतक केलं होतं. परंतु रोहित शर्मा आणि विराट कोहलीची विकेट गेल्यानंतर ऑस्ट्रेलियानं खेळात पकड बनवली. (Latest Sport News)

विराट कोहलीने ५६ आणि श्रेयस अय्यरने ४८ धावांचे योगदान दिले. त्यानंतर जडेजाने ३५ धावांची खेळी करत शेवटपर्यंत लढा दिला. परंतु ऑस्ट्रेलियाकडून ग्लेन मॅक्सवेलच्या फिरकीनं भारतीय फलंदाजांना अडकवून ठेवलं. मॅक्सवेलनं ४ तर जॉस हेजलवूडने २ विकेट्स घेतल्या.

दरम्यान तिसऱ्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. डेविड वॉर्नर आणि मिचेल मार्श यांनी दणक्यात सुरूवात करत हा निर्णय सार्थ ठरवला. मिचेल मार्श आणि वॉर्नर यांनी वादळी सुरूवात केली. या दोघांनी ८ षटकात ७८ धावा केल्या. डेविड वॉर्नरने सहा चौकारच्या मदतीने ३४ चेंडूत ५६ धावांची खेळी केली. त्यानंतर स्मिथ आणि मिचेल मार्श यांच्यामध्ये शतकी भागीदारी झाली.

कुलदीप यादवने मिचेल मार्श याला ९६ धांवावर बाद करत जोडी फोडली. मिचेल मार्शने १३ चौकार आणि ३ षटकार ठोकले. तर स्मिथने ६१ चेंडूत ७४ धावा केल्या. स्मिथ आणि मार्श तंबूत परतल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी नांगी टाकली. एकापाठोपाठ एक गडी बाद झाले. पण दुसऱ्या बाजूने लाबुशेननं चिवट फलंदाजी करत राहिला. त्याने ५८ चेंडूत ७२ धावा केल्या. दरम्यान ऑस्ट्रेलियानं ३५२ धावा भारतापुढे ३५३ धावांचे आव्हान ठेवले.

या सामन्यात भारतीय गोलंदाजांची जोरदार धुलाई ऑस्ट्रेलियीन खेळाडू्ंनी केली. यात बुमराह आणि सिरजही ऑस्ट्रेलियाच्या तडाख्यातून वाचले नाहीत. जसप्रीत बुमराहने ३ विकेट घेतल्या पण त्यासाठी धावाही खर्च केल्या. बुमराहने १० षटकात तब्बल ८१ धावा खर्च केल्या. तर प्रसिद्ध कृष्णाने पाच षटकात ४५ धावा दिल्या. मोहम्मद सिराजने ९ षटकात ६८ धावा दिल्या.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sanjay Raut Press Conference : जागा वाटपावर संजय राऊतांची प्रतिक्रिया; सांगितले मविआच्या जागांचे सूत्र

Gold Silver Price: सोनं ७८००० वर पोहचलं; दिवाळीआधीच सोने-चांदीला झळाळी

Dustbin Scam : नवी मुंबई मनपामध्ये डस्टबिन घोटाळा; काम न करता जुने फोटो दाखवून लाखोंचा भ्रष्टाचार

Karmayogi Abasaheb: सोलापुरात ५४ वर्षे आमदार, लोकांसाठी झटला, सर्वसामान्य नेत्याची कथा मोठ्या पडद्यावर! चित्रपटाचा ट्रेलर लाँच

Priyanka Chopra Daily Skin Care: वयाच्या ४२ व्या वर्षीही कशी राहिल त्वचा चमकदार? जाणून घ्या प्रियांका चोप्राच्या ब्युटीचं सिक्रेट

SCROLL FOR NEXT